आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूर महावितरणच्या भांडारास आग; मीटर, केबल खाक: तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर -   विद्युत वितरण कंपनीच्या धारूर येथील कार्यालयाच्या भांडारास शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत विद्युत मीटर , केबल व इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर धारूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे  लागल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. आग लागली तेव्हा घटनास्थळी कुणी अधिकारी  उपस्थित नव्हते. दरम्यान, पंचनामा न करताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील साहित्य जेसीबीच्या साहाय्याने एकत्रित करण्याचे काम सुरू केल्याने नेमका आगीच्या कारणाचा पुरावा नष्ट केला जातो की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.  


धारूर शहरालगत उत्तरेस असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालय परिसरामध्ये मोठे भांडार आहे. या भांडारात पडून असलेल्या साहित्यालगत असलेल्या गवतास अचानक आग लागली. आगीत विद्युत मीटरच्या दोन ढिगाऱ्यांनी पेट घेतला. हे लक्षात येताच जगताप, वाचन घुले, विठ्ठल भागरे, गणेश काकडे यांनी बकेटने  पाणी टाकून ती विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्यामुळे ती विझविण्यास  अडथळा आला. आगीत दोन विद्युत मीटरच्या ढिगारासह केबल, विद्युत तारा, इन्सुलेटर, डीपी बॉक्स यासह इतर साहित्य खाक झाले.  धुराचे लोट दिसल्याने घटनास्थळाकडे बघ्यांनी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...