आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल गाेटे- भामरेंमध्ये जुंपली: ‘मंत्रिपद साेडा, नगरसेवक पदासाठी उभे राहून दाखवा’- गाेटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर अाली अाहे. अनिल गाेटे यांनी अामदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवून स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना लक्ष्य केले अाहे. ’भामरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत माझ्या विरोधात नगरसेवकपदाची निवडणूक लढवून दाखवावी. त्यामुळे काेणाची किती लायकी आहे ते समजेल’, असे अाव्हान गाेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिले. 


गाेटे म्हणाले, ‘धुळ्याच्या विकासासाठी अामदारकीचा राजीनामा देऊन मी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला  . सन १९९४ मध्ये गाेपीनाथ मुंडे यांनी राजकारणातील गुन्हेगारी राेखण्यासाठी संघर्ष यात्रा काढली हाेती. पक्ष वाढीला विराेध नाही. मात्र, गुंडाना भाजपमध्ये प्रवेश देऊन पक्षवाढ केली जात नसून ती केवळ सूज अाहे. पक्षवाढीच्या नावाखाली गुन्हेगारांचे शुध्दीकरण करणे चुकीचे अाहे. पक्षासाठी वीस -तीस वर्षांपासून अनेक जुने कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहे. पक्षाच्या वाईट काळातही त्यांनी साथ साेडलेली नाही.  अशा कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देणे गरजेचे अाहे. यासाठी लढा येत आहे. मात्र, अद्याप पक्षाने काेणतीही दखल घेतलेली नाही. तसेच कुणीही चर्चा केली नाही,’ अशी खंत अामदार गाेटे यांनी व्यक्त केली.

 

‘अामदार अनिल गाेटे हे निष्ठावंतांसाठी लढत नसून शहराच्या सत्तेची सर्व सूत्रे अापल्या हाती यावेत अाणि महापाैरपद मिळावे यासाठी ते हा खटाटाेप करत अाहेत,’ असा पलटवार केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी केला. 


‘शहरात काेण गुंड अाणि काेण विकृत हे नागरिकांना चांगले माहित आहे. भाजपतर्फे सुशिक्षितानाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर निष्ठावंतांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली जाईल,’ अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. भामरे यांनी सांगितले की, पक्षातील जुन्या व निष्ठावंतांना  निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल. मात्र, निवडून येऊ शकणाऱ्या काही उमेदवारांना पक्षात घ्या, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत.  ज्यांना भाजपत प्रवेश दिला आहे ते गुंड असल्याचा आरोप होत आहे.

 

दुसरीकडे याचा उमेदवारांना अामदार अनिल गाेटे यांच्याकडून पक्षात प्रवेश दिला गेला असता तर ते चांगले ठरले असते. अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणारे तेच अाहेत. अाम्ही िकती गुंडांना पक्षात घेतले याची माहिती द्यावी’, असे अाव्हान डाॅ.भामरे यांनी गोटे यांना दिले.  भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या शीतल नवले यांनी अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. अमाेल मासुळे हे गुंड नाही. मनाेज माेरे यांच्यावर आंदोलनामुळे काही गुन्हे असतील,’ अर्शी सारवासारवही भामरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...