आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिमेला दिली प्रतीकात्मक धुनी, पाजले दूषित पाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पत्रकारांशी गैरवर्तणूक करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिमेला त्यांच्याच कार्यालयासमोर प्रतीकात्मक धुनी देत दूषित पाणी पाजण्यात आले. त्यांच्या अशोभनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी आज, गुरुवारी जिल्हा कचेरीवर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीत सहभाग असलेल्या १६ संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्या पत्रकारांसमवेत स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या सभेत तीव्र शब्दात निषेध केला. 

 

जिल्हाधिकारी यांनी ३१ डिसेंबरला पत्रकार व संपादकांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा अपमान केला. या घटनेचा मार्मिक आणि तिखट शब्दात पत्रकार, संपादकांनी निषेध नोंदवला. त्यांनी केलेल्या गैरवर्तनावर माध्यम क्षेत्र संतप्त झाले आहे. यावेळी रवि टाले, अरुणकुमार सिन्हा, संदीप भारंबे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सिद्धार्थ शर्मा, पुरुषोत्तम आवारे, शौकतअली मीरसाहेब, गणेश बोरकर, शैलेश अलोने, पी.एन. बोळे आदींनी मते मांडली. संचालन प्रमोद लाजुरकर यांनी केले. आंदोलनात अनिल माहोरे, गजानन सोमाणी, विजय केंदरकर, शंकर कंकाळ, राजेश शेगोकार, रामविलास शुक्ला, गजानन सोमानी, पद््माकर आखरे, श्रीकांत जोगळेकर, सुधाकर खुमकर, विलास नसले, अविनाश राऊत, श्रीमती चंदा शिरसाट, वंदना शिंगणे, निलीमा शिंगणे, विमल जैन, शंतनू राऊत, विठ्ठल महल्ले, राजरत्न सिरसाट, अन्वर खान, उमेश अलोने, सदानंद सिरसाट, जावेद जकेरीया, दिलीप ब्राम्हणे, रामदास काळे, अजय डांगे, शिवदास जामोद, अनिल दंदी, अॅड. जयेश गावंडे, रवींद्र लाखोडे, अनंत अहेरकर, सत्यशिल सावरकर, अनिल अग्रवाल, गजानन वाघमारे, जयप्रकाश रावत, उमेश साखरे, विलास नसले, प्रवीण खेते, मनोज भिवगडे, सुगत खाडे, संजय खांडेकर, रवि वैराळे, अनुराग अभंग, निलेश जोशी, प्रबोध देशपांडे, सूर्यकांत भारतीय, निलेश पोटे, कुंदन जाधव, गजानन शेळके, राजेंद्र श्रीवास, विवेक राऊत, श्रीकांत पाचकवडे, भगवान वानखडे, नीरज भांगे, मिलिंद गायकवाड, दिनेश ठोकळ, मिलिंद सभापतीकर, राजकुमार उखळकर, कपिल कसबे, विलास खंडारे, राजू चिमणकर, नीरज आवंडेकर, अता कुरेशी, प्रकाश भंडारी, रुबेन वाळके, दिलीप कुळकर्णी, विनय टोले, हर्षनंदन वाघ, रामदास वानखडे, मो. साकीब, मधू कसंबे, गणेश सोनोने, धनंजय साबळे, संतोष येलकर, संजय बोबडे आदी सहभागी झाले होते. 

 

जिल्हाधिकारी आजही नव्हते कार्यालयात 
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. अशा या पत्रकारांचे आंदोलन आणि गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या इतर घडामोडींमुळे व्यथित झालेले अकाल्याचे जिल्हाधिकारी आज, गुरुवारीही त्यांच्या कार्यालयात उपस्थित नव्हते. शासनाच्या विविध योजनांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जिल्ह्यामध्ये दौरा सुरु आहे, अशी माहिती दिली जात होती. मात्र आजच्या दिवशी ते कोठे आहेत, याबाबत अधिकृतरीत्या कुणीही बोलायला तयार नव्हते. बुधवारीदेखील काही काळ आपल्या दालनात थांबून जिल्हाधिकारी निघून गेले होते. 

 

भाजपने फिरवली पाठ 
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी स्वत: कलेक्ट्रेटवर पोहोचून आपली भूमिका मांडली. एकीकडे ही कृति होत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्याकडे पाठ फिरवली. या पक्षाचा कोणीही प्रतिनिधी तेथे पोहोचला नाही. महापौर विजय अग्रवाल आंदोलनस्थळी आले. परंतु तोपर्यंत कार्यक्रमाची सांगता झाली होती. 

 

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप-बमसं, कम्युनिस्टांचा पाठिंबा 
एखाद्या मग्रूर अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशोभनीय व्यवहार करावा, हे योग्य नाही. अशा मस्तवाल अधिकाऱ्याला शासनाने योग्य जागा दाखवली पाहिजे, अशा शब्दात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी त्यांची भूमिका मांडली. त्यासाठी शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रमेश गायकवाड, राष्ट्रवादीचे बुढन गाडेकर, भारिप-बमसंचे राजेंद्र पातोंड, विकास सदांशिव व पराग गवई, शिवसंग्रामचे संदीप पाटील लोड, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, विक्रम गावंडे जाणीवपूर्वक आंदोलनस्थळी उपस्थित झाले होते.