आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा> संगीतातील वेगळा प्रयोग, सामाजिक विषय घेऊन सादर केली गाणी
पद्मभूषण गोविंदभाई श्राफ साहित्यनगरी
ओ रात के मुसाफिर तू भागना संभल के पोटली मे तेरे हो आग ना संभाल के
चल तो तू पडा है, फासला बडा है, जान ले अंधेरे के सर पे खून चढा है ।
मुकाम खोजले तू, मकान खोजले तू , इन्सान के शहर में इन्सान खोज ले तू ।।
संगीताच्या माध्यमातून वेगळी जागृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच अवलियांनी रविवारी औरंगाबादकरांना विचार करण्यास भाग पाडले. बॉलीवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या तरुणाईने पीयूष मिश्रा यांच्या वेगळ्या धाटणीच्या बल्लीमारन बँडला उत्स्फूर्त दाद दिली. सरस्वती भुवनच्या मैदानावर औरंगाबादकरांनी तुडुंब गर्दी केली होती. दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने झाला. सिनेमात कायम वेगळा प्रयोग करणारे पीयूष यांना लाइव्ह पाहण्याचा आनंद औरंगाबादकरांनी घेतला.
रंगमंचाच्या मधोमध गळ्यात शाल, डोक्यावर इंग्लिश कॅप आणि हार्मोनियम वाजवत सादरीकरण करणाऱ्या पीयूष यांच्या साधेपणाने कानसेनांची मने जिंकून घेतली. बगल में चांद होगा, बगल में लोरिया, उठजा भाऊ, आरंभ हे प्रचंड... या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. हम लेेंगे ऐसे बदला तुमसे... अशा प्रत्येक गाण्यातून वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न बल्लीमारन बँडने केला. नोटबंदी, आणीबाणी, युद्ध, घोटाळे अशा विविध विषयांवर पीयूष यांनी स्वत: लिहिलेल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.
प्रत्येक शोपूर्वी मनात धडधड असते
प्रत्येक शोपूर्वी कलाकारांच्या मनात धडधड असते. कारण प्रत्येक सादरीकरण आमच्यासाठी नवे आहे. प्रत्येक वेळी प्रेक्षकांना नवीन काय देता येईल हा विचार मनात असतो. त्यामुळे कायम प्रयोग होत असतात. ते प्रेक्षकांना अावडतील का, याचे दडपण मनावर असते. औरंगाबादच्या रसिकांसाठी आम्ही दोन नवीन गाण्यांचा समावेश केला. ही गाणी बॉलीवूडमधली नाहीत. अनेक लोक पहिल्यांदा ही गाणी ऐकतात. त्यांचा प्रतिसाद आमचे प्रोत्साहन वाढवतो.
प्रत्येक शोपूर्वी मनात धडधड असते
प्रत्येक शोपूर्वी कलाकारांच्या मनात धडधड असते. कारण प्रत्येक सादरीकरण आमच्यासाठी नवे आहे. प्रत्येक वेळी प्रेक्षकांना नवीन काय देता येईल हा विचार मनात असतो. त्यामुळे कायम प्रयोग होत असतात. ते प्रेक्षकांना अावडतील का, याचे दडपण मनावर असते. औरंगाबादच्या रसिकांसाठी आम्ही दोन नवीन गाण्यांचा समावेश केला. ही गाणी बॉलीवूडमधली नाहीत. अनेक लोक पहिल्यांदा ही गाणी ऐकतात. त्यांचा प्रतिसाद आमचे प्रोत्साहन वाढवतो.
‘आरंभ है प्रचंड’ला वन्समोअर
बल्लीमारन बँडमध्ये तालवाद्य जयंत पटनायक, गिटार निशांत, सिंथेसायझर लुभानो आणि साउंड इंजिनिअर म्हणून रतीफ यांनी साथसंगत दिली. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणे बँडने वन्समोअर घेतले.
औरंगाबादकरांसाठी खास नवे गाणे
फीलगुड हा विषय घेऊन मिश्रा यांनी नव्याने तयार केलेले गाणे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये गाण्यात आले. एकदम करेक्ट है जमाना, ना तू किट किट जमाना, एकदम करेक्ट है जमाना. देश फीलगुड असे या गाण्याचे बोल आहेत. ‘गुलाल’ सिनेमातील ‘आरंभ है प्रचंड’ या गाण्याचे सादरीकरण अंगावर शहारे आणणारे होते.
सदाबहार गीतांच्या कार्यक्रमासाठी नाही, तर विचारांसाठी गातो : बल्लीमारन बँड हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम नाही तर लोकांना सिस्टिमचे दोष दाखवणे, बंधुभाव आणि देशभक्ती असे अनेक विचार देण्याचा प्रयत्न यातून केला जातो. हा प्रयोग रसिकांना आवडतो आहे. देशभरात अनेक प्रयोग झाले. महाराष्ट्रात मुंबई वगळता पहिल्यांदाच सादरीकरण करत असल्याचे मिश्रा म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...पियुष मिश्रा प्रेझेंट्स 'बल्लीमारन' कार्यक्रमाचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.