आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापु. ल. देशपांडे सभागृह
-सकाळी ११ वाजता : 'आरंभ है प्रचंड' हा पीयूष मिश्रा यांचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम सादर होईल. सूत्रसंचालन अनुज खरे करणार आहेत.
-१२.३० वाजता : कथाकथन : 'भारतीय संस्कृती आणि इतिहास' या विषयावर विनीत वाजपेयी बोलतील. संचालन विकास सिंग करणार आहेत.
- दुपारी २ वाजता : 'कहाणी अमर चित्रकथे'ची या विषयावर रिना पुरी, साबियो मॅनक्रहन्स यांच्याशी विकास सिंग संवाद साधतील.
- ३.३० वाजता : प्रख्यात भाषातज्ज्ञ, कवी स्वानंद किरकिरे यांच्याशी 'भाषा : एक खोज' या विषयावर लक्ष्मी पंत संवाद साधणार आहेत.
- ४.३० वाजता : काव्य, पत्रकारिता आणि सिनेमा : 'कॉकटेल फॉर सक्सेस' या विषयावर अालोक श्रीवास्तव बोलतील. संचालन अनुज खरे करणार आहेत.
डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह
- सकाळी ११ वाजता : 'पालकत्व : एक कला'वर प्रिया सचान बोलतील.
- १२.३० वाजता : 'लोकसाहित्याचा आजवरचा प्रवास आणि भवितव्य' या विषयावर डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्याशी प्रशांत पवार संवाद साधतील.
- २ वाजता : मेजर जनरल जी. डी. बक्षी भारतीय लष्कर, आझाद हिंद सेना, भारत-चीन संबंध आदींविषयी बोलणार आहेत.
- ३.३० वाजता :'पानिपतची लढाई'वर विश्वास पाटील यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधतील
- ४.३० वाजता : होणाऱ्या कविसंमेलनात वैभव जोशी, दासू वैद्य, अनुराधा पाटील, इंद्रजित भालेराव, केशव खटिंग यांचा सहभाग असेल. संचालन श्रीकांत उमरीकर, मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.
बशर नवाज सभागृह
- सकाळी ११ वाजता : परेश चिटणीस 'अक्षर स्वभाव सांगते' या विषयावर रंजक माहिती देतील.
- १२.३० वाजता : मिलिंद कुलकर्णी यांची निवेदनाची कार्यशाळा होणार आहे.
- २ वाजता : बाळासाहेब परीट, हिंमतराव पाटील यांच्या खुमासदार कथा ऐकण्याची संधी आहे.
- ३.३० वाजता : बब्रुवान रुद्रकंठावार यांच्या साहित्याचे अभिवाचन पद््मनाभ पाठक, सतीश जाधव, सुजाता पाठक करतील.
- ४.३० वाजता : राम आणि गोपाल जाघम यांचे लोहतरंग वादन होणार आहे.
५.३० वाजता : अमेय दक्षिणदास यांची नाट्यलेखन विषयावर कार्यशाळा होणार आहे.
सर्व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.