आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यात दुर्गा पेंडॉल खुले; आरोग्य-पर्यावरणाची संकल्पना, 10 टन चांदीपासून 40 कोटी रुपयांचा रथही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्याचा नवरात्रौत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या नऊ दिवसांत हे शहर कधी झोपत नाही. या शहरात साडेचार हजार लहान-मोठे पेंडॉल बनवले आहेत. विशेष म्हणजे या पेंडॉलद्वारे देश-विदेशातील सध्याची परिस्थिती आणि समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक पेंडॉलचे वेगळे वैशिष्ट्य आणि कथा आहे. त्यात ऐतिहासिक वारशाचेही प्रतिबिंब पडले आहे. या वेळी कोलकात्याच्या बहुतांश पेंडॉलमध्ये राजस्थानची झलक दिसत आहे. उदा. श्रीभूमी स्पोर्टिंगची संकल्पना पद्मावत महाल, चेतला क्लबमध्ये शीशमहाल आणि विहिरी, मोहंमद अली पार्कमध्ये चित्तोडचा किल्ला, संतोष मित्र चौकात राजस्थानी कला. त्याद्वारे एेतिहासिक काळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याशिवाय सामाजिक थीमवरही पेंडॉल बनवण्यात आले आहेत. या पेंडॉलसाठी ४० हजार ते ४० कोटी रुपये लागले आहेत. हे पेंडॉल पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येत आहेत. हॉटेलमध्ये जागा नाही. टॅक्सीचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. 


दुर्गामातेच्या जन्मापासून विसर्जनापर्यंतची कथा 
चेतला क्लबने विसर्जनाच्या संकल्पनेवर शीशमहालाचा पेंडॉल बनवला आहे. नाव आहे शीशमहाल. त्यात दुर्गामातेची मूर्ती आहे. हा काचमहाल आकर्षक आहे. मोठ्या संख्येत लोक तो पाहण्यास येत आहेत. त्यात झुंबर आणि अनेक प्रकारचे दिवेही लावले आहेत. क्लबच्या रुनकिनी घोष यांनी सांगितले की, २५० कलावंतांना चार महिन्यांत तो तयार केला आहे. या पेंडॉलमध्ये मातेच्या जन्मापासून विसर्जनापर्यंतची पूर्ण कथा सांगितली आहे. त्यासाठी ६५ लाख रुपये खर्च आला आहे. 


बाबू बागानमध्ये टेराकोटा कलेपासून पेंडॉल तयार केला आहे. म्हणजे पेंडॉल तयार करण्यासाठी फक्त मातीचाच वापर करण्यात आला आहे. समितीचे सरोज भौमिक म्हणाले की, तो ३० कलावंतांनी ६ महिन्यांत बनवला आहे. बंगालची जी संगीत वाद्ये नामशेष होत आहेत ती नव्या पिढीला माहीत व्हावीत यासाठी पेंडॉलमध्ये अशी १० वाद्ये तयार केली आहेत. दुर्गामातेची मूर्तीही टेराकोटा कलेपासून बनवली आहे. नवरात्र समाप्तीनंतर ही वाद्ये संग्रहालयात ठेवली जातील. 

 

पर्यावरण: प्लास्टिकमुळे सागरी जीवनाला धोका 
लाल बागानमध्ये पर्यावरण या संकल्पनेवर पेंडॉल बनवला आहे. त्यात प्लास्टिकचे धोके सांगण्यात आले आहेत. प्रवेश करताच मासे आणि वेस्टेज प्लास्टिकचे ग्लास दिसतात. क्लबचे सचिव तापसकुमार यांनी सांगितले की, समुद्रात प्लास्टिक आढळत आहे. सागरी जीवन नष्ट होत असून त्याचे पर्यावरणाचे तंत्रही बिघडत आहे. अशा प्लास्टिकचा वापर रोखण्याच्या संदेशासह हा पेंडॉल तयार केला आहे. त्यासाठी १५ लाख रुपये खर्च झाले आहेत. 

 

४ महिन्यांत अर्जुनाच्या रथासारखा पेंडॉल 
कोलकात्याच्या संतोष मित्र चौकात महाभारत युद्धाच्या संकल्पनेवर पेंडॉल बनवला आहे. त्यात चांदीचा रथ तयार केला आहे. त्यासाठी १० टन चांदी लागली आहे. क्लबचे सजल बोस म्हणाले की, हा चांदीचा रथ तयार करण्यास ४० कोटी रुपये लागले आहेत. हा पेंडॉल बनवण्यासाठी चार महिने लागले. हा रथ ४ भागांत बनवण्यात आला. नंतर ते येथे आणून जोडण्यात आले. 

 

हळदीचा पेंडॉल; हा शुभ, आरोग्यासाठीही चांगला 
हे छायाचित्र लेक पल्लीत हळदीपासून तयार पेंडॉलचे आहे. त्यासाठी १५ टन हळकुंड लागले. १५ लाख रुपये लागले. क्लबचे सहायक सचिव कौस्तुभ दास यांनी सांगितले की, प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर होतो. ती आरोग्यदायीही आहे. भाज्यात कितीही मसाले टाकले तरी चिमूटभर हळदीने तिला रंगत येतेच. दुर्गामातेच्या नऊ रूपांपैकी एक रूप अन्नपूर्णा मातेचे. स्वयंपाकघरात तिचा रहिवास असतो. प्रत्येक महिलेत अन्नपूर्णामाता असते. त्यामुळे मातेचा अन्नपूर्णा अवतार दाखवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...