आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- प्रकरण १- ती गराेदर अाहे, पण इलाजासाठी पुरेसे पैसे नसल्याने काही दिवसांपासून डाॅक्टरांकडेच गेलेली नाही ... प्रकरण २- मुलांची शाळेची फी भरली नाही, म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून वारंवार विचारणा हाेतेय. त्यामुळे मुलाने काही दिवसांपासून शाळेत जाणेच बंद केले... प्रकरण ३- घराचा हफ्ता थकला... बंॅकेचे वसुली अधिकारी घरी चकरा मारताय...ही अवस्था अाहे वन विभागात कायम असलेले वनक्षेत्रपाल, वनपाल अाणि वनरक्षकांची. वन विभागातील कर्मचाऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागात स्थलांतरीत केल्यानंतर दाेन्ही विभागांनी या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळू शकलेले नाही. त्यामुळे अाता जगायचे कसे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमाेर उभा ठाकला अाहे.
सरकारी कर्मचारी म्हटले की, अाटाेपशीर काम अाणि वेळच्या वेळी पगार ही बाब गृहीत धरली जाते. मात्र वनक्षेत्रपाल, वनपाल अाणि वनरक्षक याला अपवाद ठरले अाहे. राज्य सरकारने बदली कायदा २००६ नुसार वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षकांच्या बदल्या तीन महिन्यांपूर्वी केल्या. त्यात प्रादेशिक वन विभागातील अधिकारी कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागाकडे बदली केले. बदली झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांचे लेखाशीर्ष झाले नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी न मिळाल्याने यांचे पगार रखडले अाहेत. वन विभागाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बदली धाेरण १५ मार्चला जाहीर केले. त्यानुसार वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षकांच्या बदल्या सामाजिक वनीकरण विभागात करण्यात अाल्या. वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण व संशाेधनसह चार विभाग अाहेत. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात झाल्या. काही विभागात अधिक तर काही विभागात कमी अधिकारी-कर्मचारी असल्याने नवीन पदे निर्माण करण्यात अाली. या घाेळात नवनिर्माण पदांच्या पदमंजुरी कागदपत्रांत तिढा निर्माण झाला. हा तिढा तीन महिन्यात न सुटल्याने बदली झालेल्या वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षकांना पगार सुरू हाेण्याची वाट पाहावी लागत अाहे. संबंधितांनी नवनिर्मित पदांवर बदली झाल्याने त्यांचे वेतन काढण्याची प्रक्रिया सुरू अाहे. येत्या पंधरा दिवसात पगार हाेतील असे वनविभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, असे अाश्वासन गेल्या तीन महिन्यांपासून दिले जात अाहे.
कर्मचाऱ्यांचे असेही काही अनुभव
> मुलाच्या शाळेचे शुल्क दाेन महिन्यापूर्वी भरण्याचे नियाेजन केले हाेते. परंतु पगारच न झाल्याने शुल्क भरू शकले नाही. शाळेचे शिक्षक अाता राेज फाेन करून शुल्क भरण्याचा अाग्रह धरत अाहे. मुलाकडे देखील राेज शुल्काची मागणी हाेत अाहे. त्यामुळे ताे शाळेतच जायला तयार नाही.
> अाम्ही पती-पत्नीने काही पैसे जमा करून अाणि उर्वरित कर्ज काढून घर घेतले. दर महिन्याच्या तीन तारखेला कर्जापाेटी हफ्ता भरावा लागताे. परंतु पगारच नसल्यामुळे तीन महिन्यापासून हफ्ता भरलेला नाही. त्यामुळे बंॅकेचा तगादा सुरू झाला अाहे. शिवाय व्याजही वाढत अाहे.
> मी या विभागात काम करते. पतीचे तुटपुंजे उत्पन्न असल्यामुळे मी नाेकरी करते. दाेघांच्या पगारातून अामच्या संसाराचा गाडा पुढे ढकलला जात अाहे. काही महिन्यांपासून मी गराेदर अाहे. मात्र, पगारच नसल्याने डाॅक्टरकडे उपचार करण्यासाठी देखील मला जाता येत नाही.
पगार न घेता करायची १३ काेटी वृक्ष लागवड
वन विभागाने यंदा १३ काेटी इतक्या वृक्षलागवडीचे लक्ष ठेवले अाहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, खासगी जागेत वा शेती क्षेत्रात झाडे लावून देणे, गावाेगावी वृक्षाराेपणाचे कार्यक्रम घेणे या सर्व बाबींची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर अाहे. मात्र, तीन महिन्यांपासून वेतनच नसल्याने प्रवासासाठी खर्च कसा करावा, असा देखील त्यांना प्रश्न पडत अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.