आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजली दमानियांविरुद्ध माजी मंत्री एकनाथ खडसेंचा एफआयआर रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर ५ जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी खडसेंविरुद्ध दमानिया व इतर पाच जणांनी डिसेंबर २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. त्याला राष्ट्रीयकृत बँकेचा ९.५ कोटी, तर एका सहकारी बँकेच्या १० लाखांच्या डीडीच्या प्रती पुरावा म्हणून जोडल्या.

 

मात्र हे डीडी दमानिया व इतरांनी बँकेतून चोरल्याची तसेच खोटी कागदपत्रे दिल्याची तक्रार खडसेंनी केली होती. पोलिसांनी अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम व चार्मीन फर्न्स यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. तो रद्द करण्याच्या विनंतीवर सुनावणी करत खंडपीठाने सोमवारी एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...