आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात 90, मध्य प्रदेशात 105 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये नेत्यांची बंडखोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप व काँग्रेस एकमेकांच्या निवडणूक मैदानाऐवजी आपल्याच घरात संघर्ष करत आहे. तिकीट मिळवण्याची चढाओढ हे त्यामागचे कारण. यामध्ये भाजप काँग्रेसचे मंत्री किंवा खासदार राहिलेले अनेक दिग्गज आहेत. आता हे नेते अन्य पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राजस्थानमध्ये भाजपला ६० जागांवर व काँग्रेसला जवळपास ४० जागांवर बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, मध्य प्रदेशमध्ये भाजपला ६० व काँग्रेसला ४० ते ४५ जागांवर बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. येथील निवडणुकीत १० ते २०% जागांवर जय-पराजयातील अंतर खूप कमी असते त्यामुळे भाजप-काँग्रेसला या राज्यांमध्ये चिंता सतावत आहे. 

 

राजस्थान : भाजपचे १७० उमेदवार जाहीर, ४१ आमदारांची तिकिटे कापली 
राजस्थानमध्ये भाजपने आतापर्यंत २०० पैकी १७० उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये ४१ विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. यामध्ये चार मंत्रीही आहेत. काँग्रेसने १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात तीन विद्यमान आमदारांची नावे नाहीत. यासोबत २०१३ मध्ये अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली ज्या १५२ नेत्यांनी निवडणूक लढवली हाेती त्यातील ७९ जणांना या वेळी तिकीट मिळाले नाही. काँग्रेसला ४० ते ४५ जागांवर बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस-भाजप कार्यालयाबाहेर नाराज नेत्यांचे समर्थक आंदोलन करत आहेत. 

 

भाजप खासदार, आमदारांना काँग्रेस देतेय तिकीट 
काँग्रेसने भाजपच्या ७ बंडखोरांना तिकिटे दिली. यात दौसाहून भाजप खासदार हरीश मीणा आहेत.भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्रसिंह यांना काँग्रेसने शनिवारी सीएम वसुंधरा राजेंविरुद्ध झालरापाटमधून तिकीट दिले आहे. भाजपने ५ बंडखोरांना तिकिटे दिली. 

 

भाजप व काँग्रेससमोर २ राज्यांत बंडखोरांचे सर्वात मोठे आव्हान 
भाजपचे बंडखोर : मंत्री बाबुलाल वर्मा, सुरेंद्र गोयल, धनसिंग रावत, राजकुमार रिणवा, आमदार ज्ञानदेव अहुजा, अनिता कटारा, राधेश्याम, दिया कुमार. 
काँग्रेसचे बंडखोर : माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रभान, बी.डी . कल्ला, आमदार घनश्याम, नारायण सिंह, हिरालाल. 
मध्य प्रदेश : भाजपने ५४ आमदारांची तिकिटे कापली, निम्मे पक्षाच्या विरोधात 
मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या १४ मंत्र्यांसमोर आपल्याच पक्षाचे नेते अपक्ष किंवा अन्य पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत. याशिवाय भाजपचे ३ मंत्री व सुमारे २५ आमदार अन्य पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. पक्षाने ५ मंत्र्यांसह ५४ विद्यमान आमदारांची तिकिटे राज्यात कापली. भाजपने सुमारे ६३ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपचे बंडखोर २५ ते ३० जागांवर नुकसान पोहोचू शकतात. दुसरीकडे, काँग्रेसला २० ते २५ जागांवर आपल्या बंडखोर नेत्यांमुळे नुकसान होऊ शकते. राज्यात अर्ज परत घेण्याची तारीख गेली आहे. असे असताना भाजप-काँग्रेस आपल्या बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. सीएम शिवराजसिंह यांनी स्वत: व्हिडिओ कॉन्फरन्सवर नेत्यांना समजावले. 
शिवराज सरकारमील मंत्री सरताज सिंह काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. काँग्रेसचे नेते सत्यव्रत चतुर्वेदींनी मुलाला तिकीट न मिळाल्याने त्यांनी मुलगा नितीनला सपकडून तिकीट मिळवून दिले. 

भाजपचे मोठे बंडखोर : माजी मंत्री राघवजी, रामकृष्ण कुसमारिया, केएल अग्रवाल, आमदार रेखा यादव, ब्रह्मानंद रत्नाकर, नरेंद्र सिंह कुशवा, नीलम मिश्रा, जितेंद्र डागा. 
काँग्रेसचे मोठे बंडखोर : माजी मंत्री भगवानसिंह, राजेश शुक्ला, प्रतापसिंह, साहिबसिंह गुर्जर, प्रदीप जयसवाल, डी.पी. धाकड. 

बातम्या आणखी आहेत...