आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईपीएल : टॉटेनहॅमने केला सलग चाैथ्यांदा कार्डिफ टीमचा पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- टाॅटेनहॅम हाॅट्सपरने आपली माेहीम अबाधित ठेवताना इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. या क्लबने लीगमध्ये कार्डिफ सिटीचा पराभव केला. टाॅटेनहॅमने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह टाॅटेनहॅमने सलग चाैथ्यांदा कार्डिफवर शानदार विजय संपादन केला. यामुळे या क्लबला कार्डिफविरुद्धचा आपला १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवता आला. 

 

कार्डिस सिटीच्या मैदानावर टाॅटेनहॅमचा हॅरी केन हा प्रतिभावंत खेळाडू चमकला. त्याने दमदार सुरुवात करताना तिसऱ्याच मिनिटाला गाेलचे खाते उघडले. यासह टाॅटेनहॅमने लढतीत आघाडी मिळवली. त्यानंतर नऊ मिनिटांत मिडफील्डर क्रिस्टियन एरिक्सनने गाेल केला. यासह त्याने आघाडीला २-० ने मजबूत केेले. तसेच २६ व्या मिनिटाला साेन हियुंग मिनने गाेल करून आपल्या टीमचा एकतर्फी विजय निश्चित केला. 


या टीमने २१ सामन्यांमध्ये १६ व्या विजयाची नाेंद केली. याच्या बळावर टाॅटेनहॅमला ईपीएलच्या इतिहासामध्ये एकाच टीमविरुद्ध सर्वाधिक विजयाचा पराक्रमही गाजवता अाला. त्यामुळे या टीमला लीगमध्ये नवा विक्रमही नाेंदवता आला आहे. 

 

गुणतालिकेत प्रगती 
टाॅटेनहॅमला विजयाच्या बळावर विक्रमाला गवसणी घालता आली. हा विजय टीमसाठी महत्त्वाचा ठरला. यातून टाॅटेनहॅमला गुणतालिकेतही माेठी प्रगती साधता अाली. या क्लबने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. या टीमच्या नावे आता २१ सामन्यांत १६ विजयांसह ४८ गुण झाले आहेत. त्यामुळे मँचेस्टर सिटीची गुणतालिकेत घसरण झाली. आता हा संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. या टीमचे २० सामन्यांत ४७ गुण आहेत, तर लिव्हरपूल २० सामन्यात १७ विजयांसह ५४ गुणांनी अव्वल स्थानावर कायम आहे. 

 

हॅरी केनचे तीन विक्रम 
टाॅटेनहॅमचा स्ट्रायकर हॅरी केनने विजयात माेलाचे याेगदान दिले. याशिवाय त्याने सलग पाचव्या वर्षी पहिला गाेल करण्याचा विक्रम नाेंदवला. त्याने काेल (युनायटेड) अाणि स्टिव्हन गेरार्डच्या (लिव्हरपूल) विक्रमाची बराेबरी साधली. -हॅरी केन हा ईपीएलमध्ये सर्वच प्रतिस्पर्धी २८ संघांविरुद्ध गाेल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 

 

ठरला तिसरा संघ 
प्रतिस्पर्धी टीमविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात विजय संपादन करणारा टाॅटेनहॅम हा ईपीएलचा तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा पराक्रम मँचेस्टर सिटी आणि आर्सेनलच्या टीमने गाजवला हाेता. गतचॅम्पियन सिटीने लीगमध्ये बाेर्नमाऊथविरुद्ध सर्वाधिक आणि सलग विजयाचा विक्रम केला आहे.