आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटसाठी न पाठवल्याने मुलाने रचले अपहरणनाट्य; रागाच्या भरात गेला विशाखापट्टणमला, भीती वाटू लागल्याने बनाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वडिलांनी क्रिकेट शिकण्यासाठी अकादमी लावून दिली नाही म्हणून पुण्यातील १४ वर्षीय मुलगा रागाच्या भरात रेल्वेने थेट विशाखापट्टणमला निघून गेला. मात्र, वाटेतच भीती वाटू लागल्याने त्याने अपहरणाचा बनाव रचला. सोबत नेलेल्या आईच्या मोबाइलवरून त्याने वडिलांना 'अगर तुम्हारा बेटा चाहिये ताे विशाखापट्टणम आ' असा इंग्रजीत मेसेज पाठवला. त्याआधारे सहकारनगर पोलिसाचे पथक विशाखापट्टणमला रवाना झाले आणि त्यांनी तेथील पोलिसाच्या मदतीने मुलाला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

 

अफजल शेख (१४, धनकवडी, पुणे) असे मुलाचे नाव आहे. मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याची आई मासुम नूरहसन शेख यांनी सहकारनगर पोलिसांत १ जानेवारी राेजी दिली हाेती. अफजलला क्रिकेट शिकायचे होते आणि त्यासाठी त्याने क्रिकेट अकादमीत प्रवेश घेण्यासाठी आईवडिलांकडे तगादा लावला होता. मात्र, त्यांनी ती न लावून दिल्याने अफजल शिकवणीला जाण्याच्या बहाण्याने दप्तर आणि आईचा मोबाइल घेऊन घरातून बाहेर पडला आणि त्याने थेट रेल्वेस्टेशन गाठले. तिथे विशाखपट्टणम जाणाऱ्या रेल्वेत बसला आणि निघून गेला. परंतु वाटेतच त्याला भीती वाटू लागली म्हणून त्याने आईच्या मोबाइलवरून वडिलांच्या मोबाइलवर अपहरण झाल्याचा संदेश पाठवला. त्यामुळे कुटुंबीयांची धावपळ उडाली. तक्रारीनंतर पाेलिस उपनिरीक्षक एस. शिलेदार यांचे पथक लगेच विशाखापट्टणमला रवाना झाले. त्यांनी विशाखापट्टणम येथील पोलिसांना अफजलचे छायाचित्र व माहिती दिली.

 

दरम्यान, विशाखापट्टणम येथील पोलिसांना तो रेल्वेस्टेशनवर सापडला. अफजलवर पोलिसांनी पाळत ठेवली. परंतु त्याचे कुणीही अपहरण केल्याचे आढळून आले नाही. ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने क्रिकेट अकादमी न लावल्याने पळून गेल्याची कबुली दिली.