आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफी; पीक विम्याचे हप्तेही माफ करण्याचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण व्याजमाफी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. हा निर्णय झालाच तर सरकारी तिजोरीवर १५ हजार कोटींचा बोजा पडेल.

सूत्रांनुसार, या व्याजमाफीसोबतच पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे हप्ते माफ करण्याचा प्रस्तावही केंद्राच्या विचाराधीन आहे. याशिवाय बागायती पिकांच्या विम्याचे हप्तेही कमी केले जाण्याची शक्यता आहे.

 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या मोठ्या पराभवानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले असून एका उच्चस्तरीय बैठकीत व्याजमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना ७ टक्के दराने ३ लाखांपर्यंत कर्ज मिळते. यात वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्यांना ३ टक्के व्याज माफ केले जात आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाली होती. यात पेरणीपूर्वी आणि काढणीनंतरच्या काळापर्यंत नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विमा दिला जातो. यात खरीप पिकांसाठी २ टक्के आणि रब्बीसाठी १.५ टक्के दराने हप्ता भरावा लागतो.

 

बातम्या आणखी आहेत...