आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप: साेनिया प्री-क्वार्टरमध्ये; मेरी काेम अाज रिंगमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यजमान भारताच्या प्रतिभावंत युवा खेळाडू साेनियाने अापल्या करिअरमधील पहिल्याच वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरीची नाेंद केली. यासह ितने घरच्या मैदानावरील स्पर्धेतील अापल्या पदकाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या साेनियाने ५७ किलाे वजन गटाच्या लढतीत माेरक्काेच्या ताेजानी दाेअाला पराभूत केले. तिने ५-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने प्री-क्वार्टर फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला. दरम्यान, दाेअाला वाटले की विजयी झाले. मात्र, तिने काेणत्याही प्रकारचा निर्णयावर अाक्षेप नाेंदवला नाही. 

 

दुसरीकडे भारताची पिंकी राणीही अंतिम १६ मध्ये दाखल झाली अाहे. तिने ५१ किलाे वजन गटात विजयी सलामी दिली. यामुळे अाता मनीषा माेनसह या दाेघींनीही यजमान भारताच्या पदकाच्या अाशा कायम ठेवल्या अाहेत. 

 

असा जिंकला साेनियाने सामना; ५-० ने दाेअावर मात 
भारताच्या साेनियाला अापल्या वजन गटाच्या पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली हाेती. त्यामुळे तिला दुसऱ्या फेरीतून अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी मिळाली. तीन लढतीत माेरक्काेच्या ताेजानी दाेअाला नाॅकअाऊट केले. तिने २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ अशा फरकाने ही फाइट जिंकली. यामुळे तिला अापले अाव्हान कायम ठेवताना पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित करता अाला. अाता तिच्यासमाेर अंतिम १६ च्या सामन्यात २०१४ च्या वर्ल्ड चॅम्पियन स्टेनीमीराचे अाव्हान असेल. 

 

पिंकीने अनुशला नमवले 
पिंकी राणीने ५१ किलाे वजन गटाच्या सलामीला अार्मेनियाच्या अनुश ग्रिगाेरयानला पराभूत केले. तिने ४-१ अशा फरकाने हा सामना जिंकला. यासह तिला दमदार सुरुवात करता अाली. तिच्या करिअरमधील ही तिसरी जागतिक बाॅक्सिंग स्पर्धा अाहे. मात्र, तिला अद्याप या स्पर्धेत पदकाची कमाई करता अाली नाही. अाता अव्वल कामगिरीच्या बळावर पदक जिंकण्याचा तिचा मानस अाहे. 

 

मेरी काेमला एेतिहासिक कामगिरीची संधी 
पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मेरी काेमला जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत एेतिहासिक यश संपादन करण्याची संधी अाहे. यासाठी ती अाज रविवारी रिंगमध्ये उतरेल. ४८ किलाे वजन गटाच्या अंतिम चारमधील प्रवेशाने तिच्या नावे स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ७ विक्रमी पदकांची नाेंद हाेईल. अशी कामगिरी करणारी मेरी काेमही जगातील एकमेव महिला बाॅक्सर ठरेल. 

बातम्या आणखी आहेत...