आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- घरात असो की घराबाहेर हॉटेलमध्ये भाजीला तडका असल्याशिवाय जेवणाची मजा नाही, अशी बहुतांश लोकांची भावना असते. मात्र, या आणि अशा प्रकारच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे देशात सतत गोडेतेलाचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. देशात एक व्यक्ती वर्षाकाठी सरासरी १७.५-१८ किलो तेल खात आहे. तज्ज्ञांनुसार, ४० वर्षांवरील नागरिकांनी वर्षात जास्तीत जास्त ७ किलो तेलाचा वापर केला पाहिजे. आरोग्याप्रती जागरूक लोकांनी नव्या पद्धतीच्या तेलाचा (उदा. ऑलिव्ह, अव्होकाडो) वापर वाढवला आहे. हे लोक तेलाचा बदलून बदलून वापर करत आहेत. देशात राइस ब्रानचा वापर दरवर्षी सुमारे ५० हजार टन वाढत आहे. उच्च उत्पन्न गटातील लोक खाण्यात ऑलिव्ह आॅइलला प्राधान्य देत आहेत.
भारतात गेल्या ८ वर्षांदरम्यान सूर्यफुलाच्या तेलाचा वापर जवळपास अडीच पटींनी वाढला आहे. शेंगदाणा तेलाचा वापरही कमी झाला आहे. दुसरीकडे, जवळपास २३ वर्षांनंतर वनस्पती तेलाचे प्रमाण जवळपास स्थिर आहे. त्याची देशांतर्गत मागणीही घटत आहे. वनस्पती तेलाचा उपयोग ८० टक्क्यांपर्यंत व्यावसायिक वापरासाठी केला जात आहे. द सॉल्व्हंट एक्सट्रेक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार (एसईए) देशात सध्या एक व्यक्ती वर्षभरात जवळपास १७.५ ते १८ किलो तेलाचा वापर करते. २०१७-१८ मध्ये प्रति व्यक्तीकडून सरासरी १६.५ किलो तेल खाल्ले जाईल, असा अंदाज होता. यामध्ये घरगुती वापराच्या तेलाशिवाय हॉटेल रेस्तराँ व व्यावसायिक वापराचाही समावेश आहे.
आहारतज्ज्ञ दीप्ती रावत म्हणाल्या, आरोग्यासाठी नैसर्गिक तेलाचा वापर योग्य आहे. ऑलिव्ह ऑइलचा वापर करतेवेळी हे डीप फ्रायसाठी नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो,त्यामुळे ते सॅलड आदीमध्ये फायदेशीर अाहे. एक टी स्पून(५ एमएल) तूप व १५ एमएल तेलाचा वापर चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने करायला नको. यापेक्षा कमी वयाच्या लोकांनी २० एमएल तेल प्रतिदिन वापरले पाहिजे. तेल खाताना ते बदलून बदलून खाल्ले पाहिजे हे लक्षात ठेवा. याच पद्धतीने सरासरी एका व्यक्तीस वर्षात जवळपास सहा किलो तेल खाणे आदर्श मानले पाहिजे.
भारतात सध्या गोडेतेलाचा वापर २.५ ते तीन टक्के दराने वाढत आहे. देशात सर्वाधिक आयात पाम तेलाची होते. त्याचा सर्वाधिक उपयोग व्यावसायिक कारणांसाठी होतो.
गोडेतेलाचे फायदे व तोटे जाणून घ्या
ऑलिव्ह
-पार्किन्सन-अल्झायमर आजार दूर ठेवते
आहारतज्ज्ञ दीप्ती रावत म्हणाल्या, यात अँटी ऑक्सिडंट असते, यामुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात व पार्किन्सन,अल्झायमरपासूनही बचाव करते. मात्र याच्या ५ एमएलमध्ये ४५ उष्मांक असतात.
शेंगदाणा :
-बॅड कोलेस्टेरॉल कमी करते
इंद्रप्रस्थ अपोलो हाॅस्पिटलचे डॉ. के. के. पांडे म्हणाले, यामध्ये मोनो व पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.
राइस ब्रान
-इन्सुलिन रेझिस्टन्स चांगला करते
यामध्ये कोलेस्टेरॉल स्तर कमी आढळतो. हे तेल इन्सुलिनचा प्रतिकार चांगला करते. यातील स्क्वालीनमुळे त्वचेला तजेलदारपणा येतो. मात्र या तेलात ओमेगा-३ नसल्यासमान. त्यामुळे योग्य ठरत नाही.
मोहरी
-सर्दी व त्वचाविकारात फायदेशीर ठरते
तज्ज्ञ एच.ए. मिश्रा म्हणाले, याचे संतुलित प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया चांगले करते. भूक वाढवते. सर्दी, त्वचाविकारात फायदेशीर ठरते. मात्र यातील घटक हृदय, फुप्फुसासाठी धोकादायक.
सूर्यफूल
-हृदयविकार आणि कर्करोगापासून बचाव
ओमेगा-६ व जीवनसत्त्व ई असल्याने हे शरीराच्या पेशींसाठी लाभदायक आहे. कर्कराेग व हृदयारोगापासून बचाव करते. प्रतिकार शक्ती तंत्र व मज्जासंस्था चांगली करते.
क्रूड व साेन्यानंतर सर्वाधिक तेलाची आयात
जीपीएन रिसर्चचे मॅनेजिंग पार्टनर नीरव देसाईंच्या अनुसार क्रूड (कच्चे) तेल व सोन्यानंतर देशात सर्वाधिक आयात गोड तेलांची होते. भारत गोड तेलाची आवश्यकतेच्या ७५% आयात करतो. या हिशेबाने ८० हजार कोटी रु.ही आयात होते. देशात सोयाबीन तेलाची आयात ब्राझील, अर्जेंटिना व पराग्वेतून, सूर्यफूल तेल युक्रेन, रशिया, अर्जेंटिनातून, पाम तेल इंडोनेशिया, मलेशिया व थायलंडमधून सर्वाधिक होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.