आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांच्या शिष्टाईमुळे सर्वच मंडळांना मंडप उभारणीस मुभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रस्त्यावर मंडप उभारणीस महापालिकेने परवानगी नाकारल्याने रविवारी (दि. ९) शहराच्या मध्यवस्तीत रास्ता राेकाे करण्याच्या तयारीत असलेल्या गणेश मंडळांना अखेर पाेलिसांच्या मध्यस्थीने दिलासा मिळाला. शहरातील कायदा अाणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या सर्वच मंडळांना परवानगी देणे गरजेचे असल्याचे पाेलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमाेर स्पष्ट केल्याने अखेर परवानगी पत्र प्रशासनाकडून देण्यात अाले. त्यामुळे यंदाच्या गणेशाेत्सवावरील माेठे 'विघ्न' टळल्याचे बाेलले जात अाहे. दरम्यान, रास्ता राेकाेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी मंडपांना परवानगीचे पत्र मिळताच ढाेल ताशांच्या गजरात जल्लाेष केला. 


घनकर लेनमध्ये दरवर्षी माेठ्या जल्लाेषात साजरा हाेणाऱ्या व गणेशभक्तांचे प्रमुख अाकर्षण असलेल्या 'नाशिकचा राजा' या गणेश मंडळाच्या मंडपाने संपूर्ण रस्ताच बंद केल्यामुळे उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या नियमावलीचा भंग झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी येथे मंडप उभारणीस मज्जाव केला हाेता. या मंडळासह २५ मंडळांना या नियमाचा फटका बसत हाेता. इतकेच नाही तर जुने नाशिक परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंडपांचे अतिक्रमण हटविण्याची तयारीही प्रशासनाने केली हाेती. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेशभक्तांनी रस्त्यांवर टेबल टाकून गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा इशारा दिला हाेता. हा वाद सरकारवाडा पाेलिस स्टेशनपर्यंत जाऊन नेरे यांनी समीर शेटे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना दिले. तर शेटे यांनीही नेरेंनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी मध्यस्थाची भूमिका वटवित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. शिवाय महापालिका प्रशासनालाही कायदा अाणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे अावाहन केले. दुसरीकडे संतप्त कार्यकर्ते रास्ता राेकाे करण्याच्या तयारीत घनकर लेनमध्ये जमले. पाेलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत परवानगीचे पत्र देण्यास भाग पडले. यावेळी गणेशाेत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार अादी उपस्थित हाेते. 


पाेलिसांसह पालिकेने दिले पत्र 
शहरातील गणेश मंडळांना ना हरकत दाखला देण्याची जबाबदारी नक्की काेणाची यावरूनही महापालिका अाणि पाेलिस प्रशासनात वाद झाला. दुसरीकडे मंडळांनी लेखी परवानगीचा अाग्रह धरल्याने दाेन्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांची काेंडी झाली हाेती. अखेर पाेलिस अाणि महापालिकेने मंडप उभारणीस लेखी परवानगी दिली. त्यामुळे अांदाेलन मागे घेण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...