आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबाबदारी सोपवली तर बारामती जिंकेन; गिरीश महाजन यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या म्हणण्याप्रमाणे मी खराेखर सिध्दहस्त राजकारणी आहे. पक्षाने जबाबदारी सोपवली तर बारामतीही जिंकेन, असा दृढ विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी व्यक्त केला. काळखेडा (ता. जामनेर) येथील आएएएस अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन व मंत्री महाजन यांच्यात नात्यागोत्यांच्या आडून राजकीय सारीपाट रंगल्याचे चित्र दिसले.पहूरचे भाजप कार्यकर्ते अॅड. एस. आर. पाटील यांनी सत्कार समारंभाच्या मंचावर राजकीय विषय छेडून ईश्वरलाल जैन यांचा मंत्री महाजन यांना आशिर्वाद असल्याचे वक्तव्य केले. अॅड. पाटील यांच्या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनीही पाटील यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

 

दरम्यान, 'जामनेरचा विकास होत असेल तर मी का म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना विरोध करावा? 'असा प्रश्न उपस्थित करून ईश्वरलाल जैन यांनी म्हटले. तसे आपण पक्षनेत्यांनाही सांगितल्याचे जैन यांनी स्पष्ट करून महाजन मुख्यमंत्री व्हावे अशाही शुभेच्छा दिल्या. त्यावर महाजन म्हणाले, 'राजकीय डावपेच मला जामनेरच्या मातीने शिकवले. मुख्यमंत्री होण्याचा मला मोह नाही. कारण मोह बाळगणाऱ्यांचे काय होते ते सर्वांनी पाहिले आहे. यापुढे आमचेच सरकारही येणार व मी मंत्रीच राहणार,'असे ते महाजन म्हणाले.