आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचएएलच्या कंत्राटाचे दस्तऐवज संसदेत ठेवा; रफालवर राहुल यांचे संरक्षणमंत्र्यांना आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रफाल संरक्षण करारावर सुरू असलेल्या राजकीय लढ्यात रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यात हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड(एचएएल)च्या स्थितीवरून शाब्दिक हल्ले झाले. एचएएलला १ लाख कोटी रुपयांच्या कंत्राटाशी संबंधित दस्तऐवज मागत राहुल यांनी सीतारमण यांच्याकडे राजीनामा मागितला. दुसरीकडे, सीतारमण यांनी टि्वटवर माहिती देत आता संसदेत माफी मागणार का, अशी विचारणा राहुल यांच्याकडे केली. 
 
सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले होते की, रफालला १ लाख कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. रविवारी एका वृत्तानुसार, डबघाईच्या स्थितीतील एचएएल या कंत्राटाची आतुरतेने वाट पाहत आहे. बातमीचे कात्रण शेअर करत राहुल यांनी सीतारमण यांना टॅग करत टि्वट केले की, तुम्ही जेव्हा खाेटे बोलता तेव्हा ते लपवण्यासाठी आणखी खोटे बोलावे लागते. संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या खोट्याला खरे ठरवत संसदेत चुकीची माहिती दिली. संरक्षणमंत्र्यांनी एचएएलला १ लाख कोटी रुपयांच्या कंत्राटाची दस्तऐवज उद्या संसदेत ठेवावेत अथवा राजीनामा दिला पाहिजे. यानंतर सीतारमण यांनी दोन पानी टि्वट करत लिहिले की, काँग्रेसचे अध्यक्ष देशाची दिशाभूल करत आहेत ही बाब लाजिरवाणी आहे. एचएएलने २०१४ ते २०१८ दरम्यान २६,५७०.८ कोटी रुपयांच्या कंत्राटावर स्वाक्षरी केली आहे. ७३,००० कोटी रुपयांची कंत्राटे मिळण्याच्या बेतात आहेत. राहुल गांधी याबाबत देशाची माफी मागतील काय? 
 
माेदींना देशाच्या चांगल्या-वाईटाची चिंता नाही 
एचएएलला रफाल करारात समाविष्ट न केल्याबद्दल राहुल यांनी फेसबुकवर लिहिले की, एचएएलजवळ पैसे देण्याइतपत वेतनही नाही. याचे कोणाला आश्चर्य वाटायला नको. रफाल तर दिलेच होते, आता काम पूर्ण करण्यासाठी सुटाबुटातील मित्रास लोकांची आवश्यकता आहे आणि ही एचएएलजवळ आहे. एचएएलला कमकुवत केल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. चौकीदार आपली मैत्री निभावत आहेत. देशाच्या चांगल्या-वाईटशी त्यांचे काय देणेघेणे... मैत्री कायम राहावी एवढेच.