आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे झाडं तोडू नये यासाठी दिले चक्क 2 कोटी रुपये, असे यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुरू - राजस्थानात ७० वर्षापूर्वी शाळेत लिंबाच्या झाडाखाली बसून अभ्यास केला. ते झाड न तोडण्याच्या अटीवर हरिप्रसाद बुधिया यांनी दोन कोटी रुपये खर्चून शाळेसाठी दोन मजली नवी इमारत बांधून दिली. हरिप्रसाद यांचा कोलकात्यात व्यवसाय आहे. सुमारे ७० वर्षापूर्वी ते रतननगरातील राजकीय आदर्श उमावि शाळेचे विद्यार्थी होते. तीन वर्षापूर्वी ते रतननगरला आले. तेव्हा शाळेच्या इमारत मोडकळीस आलेली पाहिली. ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले. तेव्हाच त्यांनी शाळेला नवी इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळेत असलेले कडूनिंबाचे झाड कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येऊ नये, अशी अट त्यांनी घातली. येथे जे काही बांधकाम करण्यात येईल, ते या झाडाला सुरक्षित ठेवूनच करावे लागेल, अशी अटच त्यांनी घातली. हरिप्रसाद म्हणाले, या झाडाखाली आपला विद्यार्थीदशेचा काळ गेलेला आहे. त्या काळातील काही आठवणी या झाडाखाली निगडीत आहेत. याच झाडाखाली बसून आपण अभ्यास केलेला होता. हरिप्रसाद यांंच्या अटीनुसार आता इमारतीचे बांधकाम झाले. आता तेथे शाळेची नवी भव्य इमारत उभी आहे.उद्योगपती हरिप्रसाद म्हणाले, शिक्षणासाठी पैसे खर्च झाल्याचे समाधान मिळाले. शिक्षणाचा प्रसार व्हावा हा हेतू आहे. 

 

मुलींसाठी खेळाचे मैदानही करवून घेतले 
हरिप्रसाद बुधिया यांनी २००१ मध्ये त्यांचे वडिल बृजलाल बुधिया यांच्या स्मरणार्थ रतननगरमध्ये मुलींसाठी सरकारी स्कूलची इमारत बांधून दिली. पण मुलींसाठी खेळण्याचे मैदान नाही, असे त्यांना समजले. तेव्हा त्यांनी शाळेजवळील स्वत:ची दोन कोटी ४० लाख रुपये किंमतीची जमीन दिली. 

बातम्या आणखी आहेत...