आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाला सात दशकांनंतर मालिका विजयाची संधी; ऑस्ट्रेलियाची दमछाक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंतच्या धडाकेबाज शतकांपाठाेपाठ कुलदीप यादव (३/७१) आणि रवींद्र जडेजा (२/६२) यांच्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने आता शनिवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयाचा दावा मजबूत केला. यामुळे भारताला ७ दशकांनंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा पराक्रम गाजवता येणार आहे. भारताने पहिल्य डावात ६२२ धावांचा डाेंगर रचला. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद २३६ धावा काढल्या. अद्याप ३८६ धावांनी पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे आता चार विकेट शिल्लक आहेत. यामुळे आता ऑस्ट्रेलियावर फाॅलाेऑनची नामुष्की ओढवण्याची दाट शक्यता आहे. आता हँडसकाॅम्ब (२८) व कमिन्स (२५) हे खेळत आहेत. पाऊस व अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययामुळे खेळ १६.३ षटके आधीच थांबवावा लागला. 

 

राहुलचे स्पाेर्ट्मॅन स्पिरीट ठरले लक्षवेधी 
1. जडेजाच्या चेंडूवर लाेकेश राहुलने डाइव्ह मारून मार्कस हॅरिसचा झेल घेतला. 
2. टीमने जल्लाेष केला. मात्र, पंच निर्णय देतील, त्यापूर्वीच त्याने क्लीन कॅच नसल्याचा इशारा केला. 
3. पंच इयान गुल्ड यांनी चेक केले, तेव्हा चेंडू बाऊन्स हाेऊन राहुलच्या हातात आला. त्यानंतर गुल्ड यांनी स्पिरीटसाठी त्याला थम्स-अप केले. 

 

हॅरिसची सर्वाेच्च खेळी 
हॅरिसने दुसरी सर्वाेच्च खेळी केली. त्याने ७९ धावा काढल्या. त्याच्या नावे वैयक्तिक सर्वाेच्च खेळीची नाेंद झाली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचा १८८८ मध्ये अॅशेसमध्ये ३२ धावांचा वैयक्तिक स्काेअर. 

 

यजमानांची दाणादाण 
कुलदीप व जडेजाच्या गाेलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची दाणादाण उडाली. त्यामुळे संघाने १९८ धावसंख्येपर्यंत ६ विकेट गमावल्या. टीमला चांगली सुरुवात करूनही लय कायम ठेवता आली नाही. 

 

भारताची पाच शतके; ऑस्ट्रेलियाची निराशा 
भारतीय संघाची या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली. भारताकडून चार कसाेटींत आतापर्यंत पाच शतकांची नाेंद झाली. मात्र, याच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची निराशा झाली. पुजाराने पहिल्या, तिसऱ्या आणि चाैथ्या कसाेटीत शतक साजरे केले. तसेच कर्णधार काेहलीने दुसऱ्या व ऋषभ पंतने चाैथ्या कसाेटीत शतक झळकावले.