आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघाने मिळवला 150 वा विजय; अशी कामगिरी करणारा ठरला 5 वा संघ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभूत करत चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कायम राखली. ऑस्ट्रेलियाने जर सिडनीमधील चौथा सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत राहणार आहे. द्विपक्षीय लढतीत मालिका बरोबरी राहिल्यास ट्रॉफी गेल्या मालिकेतील विजेत्या संघाच्या नावे राहते. मेलबर्नचा विजय कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा आतापर्यंतचा १५० वा विजय ठरला. कसोटीमध्ये अशी कामगिरी करणारा भारतीय संघ पाचव्या संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघांनी असे यश मिळवले आहे. 

 

सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. खेळ सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या २७ चेंडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आणला. पहिला बळी जसप्रीत बुमराहने पॅट कमिन्सच्या (६३) रूपात घेतला. त्याने कमिन्सला चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद केले. लायनला (७) ईशांत शर्माने बाद केले. भारताने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेत एकापेक्षा जास्त सामने जिंकले. 

 

बुमराह पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक बळी 
-५४ बळी टेरी एल्डरमन (ऑस्ट्रेलिया) 
-४९ बळी कर्टली अॅम्ब्रोज (वेस्ट इंडीज) 
-४८ बळी जसप्रीत बुमराह (भारत) 

२०१८: वेगवान गोलंदाजांचे ४५ बळी 


आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक २० बळी घेतले. शमी १४ विकेटसह दुसऱ्या स्थानी आहे. मालिकेतील एक सामना शिल्लक आहे. मालिकेत आपण २-१ ने आघाडीवर असून आता मालिकेतील पराभव टळला आहे.

 

सलग तिसऱ्या वर्षांत सर्वाधिक सामने जिंकण्याचा भारतीय संघाने केला विक्रम 
भारतीय संघाने २०१८ मध्ये एकूण (कसोटी, वनडे व टी-२०) ३५ सामन्यात विजय मिळवला. जगात सर्वाधिक असून यात ७ कसोटी, १४ वनडे आणि १४ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. इंग्लंड व पाकिस्तानने २९-२९ सामने जिंकत संयुक्त दुसरे स्थान राखले. टीम इंडियाने २०१७ मध्ये सर्वाधिक ३७ आणि २०१६ मध्ये सर्वाधिक ३१ सामने जिंकले होते.
 
१९७८: बेदीने घेतले होते ३१ बळी 
पाच सामन्यांच्या मालिकेत डावखुरा फिरकीपटू बिशनसिंग बेदीने सर्वाधिक ३१ विकेट घेतल्या होत्या. लेगस्पिनर भागवत चंद्रशेखरला २८ विकेट मिळाल्या. मात्र, आपण ही मालिका २-३ ने गमावली होती. 

 

सलग चौथ्या वर्षीही विजय
२०१८: कसोटीत ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी हरवले 
२०१७: टी-२० मध्ये श्रीलंकेला ५ गड्यांनी हरवले 
२०१६: कसोटीत इंग्लंडला डाव व ७५ धावांनी हरवले
२०१५: कसोटीत द. आफ्रिकेला ३३७ धावांनी हरवले 
 
देशाबाहेर ८६ वर्षांनी सर्वात चांगले प्रदर्शन 
टीम इंडियाने या वर्षी देशाबाहेर चार कसोटी सामने जिंकले. ८६ वर्षांच्या इतिहासात आपले सर्वात चांगले प्रदर्शन ठरले. यापूर्वी १९८६ मध्ये तीन सामने जिंकले होते.
 
या वर्षी आपण जिंकला एकूण ७०० वा सामना 
भारतीय संघाने एकूण (कसोटी, वनडे, टी-२०) ७०० पेक्षा अधिक सामने जिंकणारी जगातील तिसरी टीम बनली आहे. टीमने आतापर्यंत ७११ विजय मिळवले. २०१८ मध्ये भारताने ३५ सामने जिंकले. यापूर्वी ऑस्ट्रेलिया (९९९), इंग्लंड (७७४) आणि पाकिस्तान (७०२) अशी कामगिरी करू शकले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...