आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गौरी लंकेशच्या हत्येचा कट पाच वर्षांपासूनचा’:एसआयटीच्या आरोपपत्रात हिंदू संघटना सनातन संस्थेवर ठपका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या विशेष तपास दलाने (एसआयटी) बंगळुरूच्या सत्र न्यायालयात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले. एसआयटीच्या आरोपपत्रात हिंदू संघटना सनातन संस्थेवर ठपका आहे.  


सत्र न्यायालयात शुक्रवारी ९ हजार २३५ पानी अारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात सनातन संस्थेअंतर्गत असलेल्या नेटवर्कने गौरी लंकेशला लक्ष्य केले, असे नमूद केले आहे. त्यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून शिजत होता, असा दावा एसआयटीने केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आणखी मुदत हवी आहे. त्याची परवानगी एसआयटीने मागितली आहे.  
विशेष वकील एस. बालन म्हणाले, लंकेश व हल्लेखोर यांच्यात काहीही वैयक्तिक सुडाची भावना नव्हती. त्या विशिष्ट विचारधारेच्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्याविषयी त्या बोलत आणि लिहीत. त्यामुळे त्यामागे विचारधारा आणि एखादी संघटना असेल.  


एसआयटीने या अगोदर मेमध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले होते. कम्युनिस्ट पार्टीचे समर्थक व हिंदुत्वविरोधी ५५ वर्षीय गौरी लंकेश यांची गतवर्षी ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराबाहेर गोळी घालून हत्या करण्यात आली होती. तया प्रकरणात तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती.  या प्रकरणात आतापर्यंत शूटर परशुराम वाघमारे, हत्येचा मास्टरमाइंड अमोल काळे, सुजित कुमार ऊर्फ प्रवीण व अमित देगवेकरसह १८ जण आरोपी आहेत. या सर्वांवर एमएम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येतही सामील असल्याचा संशय आहे.  

बातम्या आणखी आहेत...