आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापतीची ३० राेजी निवड,अाजपासून सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या हाेणाऱ्या खर्चाचे नियाेजन करणाऱ्या स्थायी समिती सभापतींची निवड येत्या ३० अाॅक्टाेबर राेजी करण्यात येणार अाहे. याच दिवशी तासाभराच्या अंतराने महिला व बालकल्याण समिती सभापतींचीदेखील निवड केली जाणार अाहे. 

 

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत स्थायी समितीचे १६ सदस्य तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची निवड करण्यात अाली हाेती. महापाैर व उपमहापाैरांची निवड झाली असली तरी स्थायी समिती सभापतींची निवड न झाल्यामुळे २५ काेटीतून मंजूर करण्यात अालेल्या कामांना हिरवी झेंडी मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या अार्थिक नियोजनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्थायी समिती सभापतींच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून हाेते. यासंदर्भात गेल्या शुक्रवारी प्रस्ताव सादर करण्यात अाला हाेता. त्याविषयी विभागीय अायुक्तांकडून महापालिकेला पत्र प्राप्त झाले अाहे. 

 

त्यानुसार ३० राेजी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती व दुपारी १२ वाजता महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड केली जाणार अाहे. यासाठी २४ ते २६ अाॅक्टाेबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात अाली अाहे. त्यादृष्टीने हालचालींना वेग अाला अाहे. 

 

मराठे, अॅड पाेकळे अन‌् अॅड हाडा यांचे नाव चर्चेत 
महापाैरपद लेवा समाजाला तर उपमहापाैरपद काेळी समाजाला दिल्यानंतर अाता स्थायी समितीपदी मराठा समाजाला संधी दिली जाणार अाहे. यात संघटनेतून पुढे अालेले जितेंद्र मराठे यांचे नाव अाघाडीवर अाहे. कार्यकर्त्यांमध्येदेखील त्यांच्याच नावाची चर्चा सुरू अाहे. मराठे यांच्या व्यतिरीक्त अॅड. दिलीप पाेकळे व अॅड. शुचिता हाडा यादेखील सभापतीपदासाठी दावेदार अाहेत. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अथवा एक दिवस अाधी बैठक हाेऊन नावाची घाेषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...