आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची दिशा अाता लाेकप्रतिनिधींच्या बैठकीत ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी तयार असलेला नकाशा हा पूर्वीच्या सन २०१२मधील नकाशाप्रमाणेच अाहे. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे 'वाय'अाकाराचा पूल उभारणीत अनेक अडचणी येणार अाहेत. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब हाेण्याची शक्यता अाहे. कामाची तीव्रता लक्षात घेता सध्या अस्तित्वातील पुलाप्रमाणे कामाला सुरुवात करण्याचे मत पालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान पूल काेणत्या मार्गाने उभारावा, यासंदर्भात लाेकप्रतिनिधी निर्णय घेतील, यासाठी लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात अाला. 

 

शहराच्या दाेन भागांना जाेडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशावरून सध्या वाद सुरू अाहे. प्रशासनाने तयार केलेला 'टी' अाकाराच्या बांधकामाला रहिवाशांचा विराेध अाहे. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे पुलाचा दुसरा मार्ग 'वाय' अाकाराचा हाेणे अपेक्षित अाहे. दरम्यान, यासंदर्भात वस्तुस्थिती, पूर्वीचे निर्णय, तसेच तांत्रीक बाजू समजून घेऊन त्यावर याेग्य मार्ग काढण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजता महापालिका, रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक झाली. महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात अायाेजित बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत साेनवणे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता राहुल अग्रवाल, अभियंता एन. के. पाटील अादी उपस्थित हाेते. पूल उभारणीसंदर्भात रेल्वे प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली अाहे. पुलाच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी सन २०१२मध्ये नकाशा तयार केला हाेता. त्यानुसारच अाजचा नकाशा असल्याची माहिती बैठकीत पुढे अाली. त्यामुळे पुलाच्या उभारणीसाठी 'टी'अाकाराला यापूर्वी मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात अाले. शहराच्या दाेन भागांना जाेडण्यासाठी हा पूल महत्वाची भूमिका बजावताे. भविष्यात वाढणारी लाेकसंख्या अाणि त्या तुलनेने वाहनांची वाढती संख्या या गाेष्टी समाेर ठेवून या पुलाचा प्रश्न मार्गी लागणेे अपेक्षित अाहे. या अनुषंगाने गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर अाता युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या असल्याचे चित्र अाहे. 

 

पुलाची उंची, रुंदी वाढणार 
अस्तित्वातील पुलाप्रमाणेच नवीन पुलाची उभारणी करताना पुलाची उंची वाढणार असून दूध फेडरेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची रूंदी व वळण वाढणार अाहे. त्यामुळे सध्याच्या पुलाच्या तुलनेत नवीन पुलाचे चित्र नक्कीच बदलणार अाहे. 

 

तांत्रिक बाजू समजून घेऊन याेग्य मार्ग काढणार 
शिवाजीनगर उड्डाणपुलासंदर्भातील नकाशे व तांत्रिक बाजू समजावून घेण्यात अाली. यात रहिवाशांचा विराेध व मागणीचा विचार करता अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या पुलाप्रमाणेच बांधकामाला सुरुवात करण्याचे मत व्यक्त करण्यात अाले. पुलाचे काम 'टी' अथवा 'वाय' अाकाराप्रमाणे करण्याचा निर्णय लाेकप्रतिनिधींच्या बैठकीत घेतला जाईल. -चंद्रकांत डांगे, अायुक्त, महापालिका 

 

पूल अाहे तसाच तयार करा 
उड्डाणपूल माेडकळीस अाला अाहे. १०५ वर्षे जुना पूल काेसळल्यास माेठी दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माेठे नुकसान हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे पूल काेणत्या पद्धतीचा तयार करावा यावर निर्णय हाेईल तेव्हा हाेईल, त्यापूर्वी कामाची निकड लक्षात घेता सध्या अस्तित्वातील पुलाप्रमाणेच कामाला सुरुवात करण्यास काही हरकत नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुलाची उभारणी 'टी' अाकाराची करायची की 'वाय' अाकाराप्रमाणे याचा निर्णय खासदार, अामदार, महापाैर, स्थानिक नगरसेवक अादींच्या बैठकीत घेण्यात यावा, असेही ठरले. तत्पूर्वी पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असा सूर या बैठकीतून प्रकर्षाने व्यक्त झाला. 

बातम्या आणखी आहेत...