आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेमध्ये जळगावच्या संघास दुहेरी अजिंक्यपद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नाशिक येथे झालेल्या २७ व्या राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेत जळगावच्या मुला-मुलींच्या संघांनी अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघावर नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करीत प्रथमच दुहेरी यश मिळवून दिले. मुलांच्या संघातील दोघांची तर मुलींच्या संघातील तिघींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. 


नाशिक येथे सब ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. यात जळगाव जिल्हा मुला व मुलींचा संघ सहभागी झाला होता. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत अजिंक्यपद प्राप्त करून दिले. त्यात नीरज कोळी, गौरव सोनवणे, वैष्णवी पाटील, चैताली चौधरी, रोशनी खान या खेळाडूंची पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघांनी मिळवलेल्या या यशासाठी संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, नगरसेविका लताताई सोनवणे, सचिव डाॅ. प्रदीप तळवेलकर, माजी महापौर विष्णू भंगाळे, कार्याध्यक्ष अॅड.सत्यजीत पाटील, उदय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ. दिनेश पाटील, प्रशांत जगताप, इक्बाल मिर्झा, मिलिंद तळेले, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, गुलाब पाटील यांनी कौतूक केले आहे. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक विशाल फिरके, संघ व्यवस्थापक अक्षय टेमकर तर मुलींच्या संघाचे प्रशिक्षक अनिल माकडे, संघ व्यवस्थापक दीपिका श्रीखंडे होते. 


मुलांचा संघ : नीरज काेळी, शुभम चव्हाण, वैभव साेनवणे, राजेश गव्हाणे, हर्षल परदेशी, दीपेश पाटील (सर्व सिद्धी विनायक विद्यालय), पीयुष महाजन (अाेरियन स्कूल), सचिन भंगाळे, कृष्णा वाणी (सेंट जाेसेफ स्कूल), विवेक सतरे, पवन गव्हाणे, प्रणव बडे (सिद्धी विनायक प्राथमिक विद्यालय), 


मुलींचा संघ : निवेदिका काेळंबे (कर्णधार), देवयानी शिंदे, वैष्णवी पाटील, चैताली चाैधरी, तेजस्विनी झांजे, वैभवी पाटील, रक्षा मराठे, नेहा कुंगटे, दीपिका पाटील (सर्व सिद्धी विनायक विद्यालय), वैष्णवी पाटील (सेंट लाॅरेंन्स), राेशनी खान, दिव्या साेनवणे (श्रीराम विद्यालय) यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...