आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात 4 दानपेट्या फाेडून रेल्वेने भुसावळ स्थानक गाठले; संशयावरून अारपीएफने दाेघांना घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरात दोन दिवसांत मुख्य रस्त्यांवरील चार मंदिरे फोडून रोकड, चांदीचे मुकुट घेऊन रेल्वेने पळून जाणाऱ्या दोन अल्पवयीन चाेरट्यांना भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकांनी संशयावरून शनिवारी पहाटे ३ वाजता पकडले. या चोरट्यांनी जळगाव शहरातील मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे कबूल केल्यानंतर त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघे चोरटे अकोला शहरातील रहिवासी आहेत. शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.


दोघे चोरटे अनुक्रमे १५ व १६ वर्षे वयाचे आहेत. अकोला शहरात राहणाऱ्या या चाेरट्यांनी दोन दिवसांपासून जळगावात मुक्काम ठोकला होता. गुरुवारी (दि.२२) रात्री त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यावर असलेले हनुमान, महालक्ष्मी व गजानन मंदिरात चोरी केली. मंदिराचे लोखंडी गेट वाकवून आत प्रवेश करीत दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम काढून घेतली होती. यानंतर या दोन्ही चोरट्यांनी शुक्रवारी दिवसभर रेल्वेस्थानकावर मुक्काम ठोकला. शनिवारी रात्री पुन्हा शनिपेठेतील दत्त मंदिरात चोरी केली. या चोरीनंतर त्यांनी एका पोत्यात पैसे भरून पाठीवर अडकवले. हे पोते घेऊन दोघेजण रेल्वेने भुसावळ स्थानकावर गेले. दरम्यान, तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरीक्षक अंबिकाप्रसाद यादव यांनी दोघांना हटकले. दोघे संशयितरीत्या फिरत असल्यामुळे यादव यांना त्यांच्यावर संशय आला. ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता दोघांनी जळगावात मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

 

यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून शनिवारी पहाटे दोघांना जळगाव शहर पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून १४ हजार ८९ रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. यानंतर त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.स्क्रू ड्रायव्हर, टाॅमी केली जप्तचोरटे कुलूप तोडण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर तसेच शटर वाकवण्यासाठी लोखंडी टॉमीचा वापर करीत होते. त्यांच्या पोत्यातून या दाेन्ही वस्तू मिळून अाल्या आहेत. पोलिसांनी या वस्तू त्यांच्याकडून जप्त केल्या.


चाेरीचे अजब तंत्र : रात्री मंदिर परिसराची टेहळणी करायचे अन‌् दानपेटीत नाणे टाकून एेवजचा अंदाज घेऊन मारायचे डल्ला


घटनास्थळाची पाहणी
शनिवारी दुपारी १२ वाजता शहर पोलिस ठाण्याचे वासुदेव सोनवणे, अक्रम शेख, अमोल विसपुते, सुधीर साळवे, संजय शेलार, रतनहरी गिते यांच्या पथकाने चोरट्यास सोबत घेऊन घटनास्थळांची पाहणी केली. या वेळी एका चाेरट्याने शिवाजीनगर भागातील तीन मंदिरांत चोरी केल्याची सांगितले. संबंधित मंदिरात घेऊन जात त्याने कुलूप कशाप्रकारे तोडले? याचे प्रात्यक्षिकही पोलिसांना करून दाखवले. तसेच शनिपेठेतील दत्त मंदिरात चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. या चारही घटनास्थळांची पाहणी पोलिसांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...