आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गटारातील सोने बनले 350 तरुणांच्या रोजगाराचे साधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - काेणतेही शहर अन् गावात एरवी नाक मुरडायला भाग पडणाऱ्या तुंबलेल्या गटारी सर्वांनाच नकाेशा असतात. मात्र, सुवर्णनगरी जळगावात चक्क साेने देणाऱ्या गटारी येथील बेराेजगारांचे जणू करिअरच ठरल्या अाहेत. शाळेत कधीकाळी शिकलेली विज्ञानाची सूत्रे वापरून बेराेजगार युवकांनी येथील गटारीत साेन्याची खाण शाेधली अाहे. गटारीतून दरराेज एक लाख रुपये किमतीइतकेे साेने मिळत असल्याने शेकडाे बेराेजगारांना कायमचा राेजगार मिळाला अाहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात साेन्याचा धूर निघत हाेता ही अाख्यायिका वाटत असेलही; परंतु सुवर्णनगरी जळगावात चक्क साेने सापडणाऱ्या गटारी अाहेत; हे एेकून अनेकांना अाश्चर्याचा धक्का बसेल. या गटारी उपसून साेने मिळवणारे युवक जळगावात सहज नजरेस पडतात. शहरातील विविध वास्तू, इमारतीत वस्त्या करून राहणाऱ्या कारागिरांकडून दागिने घडवले जातात. बारीक काम असल्याने साेन्याचे डाेळ्यांनी दिसणारे अाणि न दिसणारे बारीक कण कारागिरांच्या कपड्यावर, शरीरावर उडतात, घरात, कामाच्या ठिकाणीदेखील पडत असतात. घर झाडण्यातून, हातपाय धुताना किंवा दागिने घडवताना वापरात येणाऱ्या पाण्यातून जड असणारे साेन्याचे कण गटारीत जातात. घरातील महिलांच्या अंगावर असलेल्या दागिन्यांची झीज हाेऊन त्यातील साेन्याचे कणही अांघाेळीनंतर गरम पाण्यासाेबत गटारीतच येतात. इतर गटारींपेक्षा कारागिरांच्या वस्तीवरच्या गटारी, सराफ बाजारातील गटारी शहरातील इतर गटारींपेक्षा वेगळ्या ठरतात. या गटारींमध्ये साेने अाहे हे निश्चित झाल्यानंतर सुरू हाेताे साेन्याचा शाेध. 

 

साेने शाेधणारे परीस : हाताला काम शाेधणारे जवळपास ३५० पेक्षा अधिक बेराेजगार युवक नाक न मुरडता गरज म्हणून या गटारींत उतरतात. काेणत्या गटारीत किती वेळात, किती साेने मिळेल, काेणत्या वेळेत, सीझनमध्ये मिळेल, याबद्दल हे युवक अनुभवातून खात्रीपूर्वक सांगतात. गटारीकडे करिअर म्हणून पाहणारी दुसरी ते तिसरी पिढी हे काम करीत अाहे. काेणत्याही विद्यापीठ, महाविद्यालयात न शिकवले जाणारे साेने शाेधण्याचे तंत्र अनुभवाने अवगत असलेले काही युवक या क्षेत्रात अाहेत. अनेक वर्षांच्या अनुभवातून हे युवक गटारातील साेने काही वेळेत वेगळे काढतात. शनिवार किंवा रविवार हा साेने शाेधण्याचा वार असताे. इतर दिवस शहरातील नसलेल्या गटारींचा शाेध असताे. या युवकांनी जिल्ह्यातील तालुक्याच्या बाजारपेठेतील गटारी वाटून घेतल्या अाहेत. अाठवड्यातून तेथे जाण्याचे वार ठरलेले असतात. 

 

असे अाहे अर्थकारण : 
गटारीत साेने शाेधणाऱ्या युवकांचे काही अनुभवाचे सिद्धांत अाहेत. काेणत्या गटारीत साेने असू शकते यासाठी लावण्यात येणाऱ्या ढाेबळ निकषात ती गटार बाजारपेठेतील अाहे की विशिष्ट वस्ती, भागातील हे शाेधले जाते. 


वस्ती, साेसायटीत राहणारा वर्ग काेणता अाहे. व्यापारी, उद्याेजक, कष्टकरी यांच्यासह काही जाती समुदाय महत्त्वाचे ठरतात. साेन्याच्या दागिन्यांचे महत्त्व असलेल्या समुदायाच्या ठिकाणच्या गटारी महत्त्वाच्या ठरतात. 


कधी-कधी साेन्याच्या कणांएेवजी दागिन्यांचे तुटलेले तुकडे, नक्षीही गटारीत येते. या गटारीत सापडणारे साेन्याचे प्रमाण दक्षिण अाफ्रिकेतील साेन्याच्या खाणीपेक्षाही जास्त अाहे. एक टन माती उपसल्यानंतर २ ते ३ ग्रॅम साेने मिळते. त्या प्रमाणात जळगावातील सुवर्णनगरीतील गटारींमध्ये ५० ते ६० किलाे मैल्यातून अर्धा ते एक ग्रॅम साेने मिळते. 


दर रविवारी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान काही युवक ठरलेल्या गटारींवर मैला, गाळ झारतात. यातून अर्धा ग्रॅमपर्यंत साेने मिळते. दिवाळी, दसरा या वेळेत थाेडी अधिक मेहनत केली तर जास्तीचे साेने मिळते. दिवसभर शाेधले तर एक ग्रॅम ते दीड ग्रॅमपर्यंतही साेने मिळत असल्याचे हे युवक सांगतात. 


३५० पेक्षा अधिक जणांचा हा व्यवसाय आहे. सर्व मिळून दिवसभरात ७०-८० हजारांचे साेने मिळवतात. ते घेणारे विशिष्ट सराफ व्यापारी अाहेत. ते या साेन्यावर प्रक्रिया करून त्याचे एक लाख रुपये बनवतात. रविवारी साेन्याची कमाई २ लाखांच्याही पुढे जाते. 

 

राजा उद्याेग, कष्टाने कमावताे 
अाम्ही कष्टाने कमावताे. गटारीत उतरणे साेपे नाही. यासाठी मेहनत, गटारीमध्ये झाेकून देण्याची तयारी लागते. तेव्हाच पाेट भरण्यापुरते साेने मिळते. माझ्या कुटुंबातील इतरही सदस्य हेच करतात. अामच्या दृष्टीने हा राजा उद्याेग अाहे. मनाला वाटेल तेव्हा करता येताे. संताेष गायकवाड, साेने शाेधणारा युवक 

 

असे शाेधतात साेने... 
भाैतिकशास्त्राच्या सिद्धांतानुसार वजनाने जड असलेले साेने सर्वात खाली असते. संपूर्ण गटार न उपसता हे युवक वाहत्या गटारीवर बसून विशिष्ट ठिकाणचा मैला गटार बाहेर काढतात. 
एका टाेपलीत थाेडा थाेडा मैला घेऊन ताे गटारीच्याच पाण्यात १० ते १५ वेळा गाेल फिरवला जाताे. वरवर असलेला मैला प्रत्येक फेरीनंतर बाहेर फेकला जाताे. १५ ते २० मिनिटे टाेपली फिरवल्यानंतर साेने अाणि अन्य धातू टाेपलीत खालच्या बाजूला एकत्र येतात. शेवटच्या टप्प्यात उरणारे धातू साेबतच्या वाटीत जमवून मग पुन्हा तीच प्रक्रिया केली जाते. 

साेने गटारीच्या पाण्यात चकाकते. खालच्या थरातील सुवर्ण मैला तारेच्या ब्रशने घासला जाताे. त्यातून इतर धातू वेगळे करून साेने वेगळे काढले जाते. यासाठी दुपारी १२ वाजेनंतरची वेळ निवडली जाते. वाहत्या व सूर्यप्रकाश पाेहोचू शकेल अशा गटारींना प्राधान्य दिले जाते. 

असा उद्याेग, अशी कमाई.... 


१५० दुकाने जळगावात साेन्याची 
२५ किलाे दिवसभर साेन्याच्या दागिन्यांचा व्यापार 
८००० कारागीर साेने घडवणारे 
१ काेटी रुपये मजुरी कारागिर राेज 
३५० तरुण गटारीतून साेने शाेधणारी 
१ लाख रुपये उत्पन्न गटारीतून साेन्याचे दररोज 

बातम्या आणखी आहेत...