आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- ससियाचीनमध्ये हिमनदीत अंघोळ करता येणे शक्य होणार आहे. यासाठी आयआयटी दिल्लीने एक जेली (द्रव पदार्थ) तयार केली आहे. यामुळे सियाचीनमधील सैनिक उणे ६० डिग्री तापमानात अंघोळ करू शकतील. ही जेली खूप थंड हवामानातही शरीर स्वच्छ राखण्यात मदत करते. १३ हजार ते २२ हजार फूट उंचीवर बर्फात राहणाऱ्या जवानांसाठी अंघोळ करणे तर दूर, पिण्याचे पाणी मिळणे खूप कठीण असते. वितळलेल्या बर्फाचे पाणी पिणे आरोग्यास अपायकारक असते, असे मानले जाते. त्यात कामावर तैनात असताना तीन महिन्यांपर्यंत सैनिकांना अंघोळ करणेही शक्य होत नाही. यापासून सुटका करून घेण्यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी एक उत्पादन जेलीच्या स्वरूपात तयार केले आहे.
अहवालानुसार, चीनच्या सीमेवर तैनात सैनिकांनी याची चाचणी घेतली असून जेली खूप चांगली असल्याचे म्हटले आहे. या फीडबॅकनंतर देशातील पूर्व कमांडने हजार उत्पादनांची ऑर्डर दिली आहे. लवकरच ती सियाचीनमधील सैनिकांपर्यंत पाठवण्यात येणार आहे.
२० मिलि जेलीने शरीर स्वच्छ होते आठवड्यातून दोनदा अंघोळही
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी दिल्लीच्या या उत्पादनातील फक्त २० मिलिचा वापर करून संपूर्ण शरीर स्वच्छ करता येते. या जेलीमुळे जवानांना आठवड्यातून दोन वेळा अंघोळ करता येईल. सियाचीन हिमनदी पाकिस्तान व चीन या दाेन्ही देशांलगत आहे. त्यामुळे भारताला तेथे कायम तीन हजार सैनिक तैनात करावेच लागतात. जवानांना साधारणत: तीन महिने तेथे तैनात केले जाते. यादरम्यान, एक महिना त्यांना १२८ किमी भागात ट्रेकिंग करत शत्रूवर लक्ष ठेवावे लागते. यापैकी अनेक भाग समुद्रापासून १६ हजार फूट उंचीवर आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.