आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्ट ब्लेअर - अमेरिकी पर्यटक जॉन अॅलनवर बाणांचा वर्षाव करून अंदमान-निकोबारच्या सेंटनल आदिवासींनी त्याला ठार केले. जॉनने मृत्यूच्या एक दिवस आधी पर्यटन डायरीत अशा हल्ल्याबाबत नोंद केली होती. मच्छीमारांच्या मदतीने आपण बेटावर गेल्याचे सांगत एका १० वर्षांच्या आदिवासी मुलाने आपल्यावर बाण चालवल्याचे त्याने नमूद केले आहे.
‘हे बाण बायबलला लागले, शरीरावर जखमा झाल्या...तरीही मी उद्या पुन्हा जाणार आहे’, असे त्याने लिहिले होते. जॉनच्या हत्येनंतर या बेट समूहावरील सेंटनल आदिवासी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी २००४ मध्ये बेटावरून जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवर त्यांनी बाणांचा वर्षाव केला होता. त्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची चर्चा झाली.
जॉनचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरवरही त्यांनी बाणांनी हल्ला केला होता. जवळपास ६० हजार वर्षांपासून जगापासून अलिप्त राहणाऱ्या या आदिवासींमध्ये १२ वर्षांनंतर बाहेरील जगातील एखादा व्यक्ती पोहोचला होता. या आधी २००६ मध्ये या आदिवासींनी २ मच्छीमारांची हत्या केली होती. दरम्यान, जॉनची एक डायरी सापडली असून यात त्याने अशा हल्ल्याबाबत आई-वडिलांना उद्देशून त्याने लिहिले आहे की, ‘तुम्हाला वाटत असेल मी किती मूर्ख आहे... पण ही जीससची इच्छा आहे. कदाचित उद्या मला बाण किंवा गोळी लागू शकते. हे देवा, हल्ला करणाऱ्यांवर राग करू नकोस. आज मी मच्छीमारांच्या मदतीने सेंटनल आदिवासींच्या बेटावर गेलो होतो. लोकांनी मला रोखलेही.
पण बायबल घेऊन मी बेटावर उतरलो. जीसस माझ्यासोबत होते. मी बेटावर पाय ठेवताच काही आदिवासींनी मला घेरले. त्यांच्या हातात धनुष्य होते. ते काहीच न बोलता माझ्या दिशेने येत होते. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. माझे बोलणे संपण्याच्या आतच १० वर्षांच्या मुलाने बाण चालवण्यास सुरुवात केली. मी पळालो. अनेक जखमा झाल्या. मी वाचलो तरी उद्या पुन्हा तेथे जाणार आहे.’ डायरीत ही नोंद केल्यानंतर जॉन दुसऱ्या दिवशी पुन्हा बेटावर गेला, पण परतला नाही. आदिवासींनी मृतदेहाच्या गळ्यात दोरी टाकून त्याला ओढताना मच्छीमारांनी पाहिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.