आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजयचे काम एकदम परफेक्ट, समीक्षकांना देत नाही टीकेची संधी : काजोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: नुकतेच एका मुलाखतीत काजोलने पती अजय देवगणचे तोंडभरून कौतुक केले. ती म्हणाली.., अभिनयात अजय देवगणचा हात कुणीच धरू शकत नाही. तो कधीच समीक्षकांना टीका करण्याची संधी देत नाही. खरं तर, तो कामच इतके परफेक्ट करतो की, त्याच्या कामावर कधीच टीका होत नाही. काजोलला अजयच्या दिग्दर्शनात काम करणेदेखील आवडते. तो वयाच्या १६व्या वर्षांपासून कॅमेरा सांभाळत आहे. जेव्हा माऊस क्लिक्स आणि बटन नव्हते तेव्हापासून तो एडिटिंग टेबलवर बसत आला आहे. त्याला चित्रपट तंत्रज्ञान सर्व काही माहीत आहे. तो एक चांगला निर्मातादेखील आहे. त्यामुळेच त्याने पैसा आणि सर्जनशीलतेला योग्य मॅनेज केले आहे. 

 

मी त्याच्यासोबत 'यू मी और हम'चे चित्रीकरण केले. त्या वेळी माझे वडील रुग्णालयात होते. मी तणावात होते. मला सेटवरीन रुग्णालयात जावे लागायचे. मात्र, अजयने चांगल्या प्रकारे मॅनेज केले. मला कधीच कामाचा ताण येऊ दिला नाही. मी रुग्णालयात वेळेवर पोहोचावी म्हणून तो मला ४ वाजेपर्यंत सोडून द्यायचा.

बातम्या आणखी आहेत...