आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करतारपूर कॉरिडॉरमुळे भारत, पाकमधील वैर संपेल : नवज्योत सिंग सिद्धू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर -   करतारपूर कॉरिडॉरमुळे भारत-पाकिस्तानातील वैर संपुष्टात येऊ शकते. अशा अनेक शक्यता कॉरिडॉरमध्ये दडलेल्या आहेत. दोन्ही देशांतील वैर संपून शांतता स्थापन होईल. धर्माकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, मी बाबा नानक देवजी यांचा दूत होऊन आलो आहे. शांतीचा संदेश देणार आहे, असे पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी व्यक्त केली.  बुधवारी होणाऱ्या कोनशिला समारंभात सहभागी होण्यासाठी केंद्रीय  अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर-बादल, शहरी गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी पाकिस्तानला रवाना झाले आहे. 


इम्रान खान यांनी बीज पेरले. आता तीन महिन्यानंतर त्याचे रूपांतर रोपट्यात झाले आहे. करतारपूरला दर्शनासाठी जाणे हा शीख समुदायासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. कॉरिडॉरमुळे हा क्षण प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. कोणताही अडथळा येणार नाही. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला निमंत्रण दिले आहे. त्याबद्दल मी इम्रान खान यांचे आभार मानतो. पाकिस्तानला भेट दिल्यावरून टीका करणाऱ्यांना मी माफ केले आहे. इम्रान यांचा मी चाहता आहे. 

 

पंजाब काँग्रेसमधील नेत्यांसमोर मोठा पेच, अमरिंदर यांचे समर्थन करावे की सिद्धूंचे ?

सिद्ध सोमवारी करतारपूर साहिबच्या दर्शनासाठी डेरा बाबा नानकमध्ये होते. कॉरिडॉरच्या कोनशिला समारंभात सहभागी झाले नाही. मात्र पाकिस्तानातील कॉरिडॉरच्या समारंभात सहभागी होणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. पंजाबमचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दहशतवादी हल्ले सुरू असताना पाकिस्तानला जाणे मनाला पटत नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तानने सैन्याला नियंत्रणात ठेवावे, असे त्यांनी सांगितले होते. पक्षाच्या दोन नेत्यांच्या वागणुकीमुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. पक्षातील नेत्यांनाच कोणाचे समर्थन करावे, हे समजायला मार्ग नाही. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्यासह अनेक नेत्यांना कोणत्या नेत्याला पाठिंबा द्यावा हेच कळायला मार्ग नाही. ते संभ्रमात आहेत. 

 

करतारपूर येथे रेल्वे स्थानक होणार   
करतारपूरमध्ये शीख यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे स्थानक बांधण्याची घोषणा पाकचे केंद्रीय रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी केली आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाईल. स्थानक परिसरात हॉटेल्सचेही बांधकाम केले जाणार आहे. पाक रेल्वेने प्रत्येकी १० एकर जमीन करतारपूर व पाच नरोवालसाठी देऊ केली आहे, अशी माहिती अहमद यांनी दिली.  लाहोरपासून १२० किलोमीटर अंतरावरील नारोवाल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...