आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीनगर- काश्मीरमध्ये यंदाची पहिली हिमवृष्टी झाली. गुलमर्गमध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ८.८ मिमी व कुपवाडात ७.४ मिमी बर्फवृष्टीची नोंद झाली. उर्वरित भागात १.५ ते २.५ मिमीपर्यंतच्या हिमवृष्टी झाली. मंगळवारी रात्री श्रीनगरचा पारा ४.२ अंशाहून शून्यावर पोहोचला. कारगिलचा परिसर देशात सर्वाधिक थंड प्रदेश ठरला. येथे पारा उणे १७ अंशांवर होता.
लडाखमध्ये तापमान १२.४ अंश सेल्सियसपर्यंत गेले होते. श्रीनगर व परिसरातील तलाव, धबधबे गोठले आहेत. खाेऱ्यात पाऊसमानाच्या दृष्टीने नूतन वर्षाची सुरूवात चांगली झाली आहे. स्कायमेटच्या मते, हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी व पावसाची हजेरी ८ जानेवारी पर्यंत राहू शकते. पश्चिमेकडील वातावरण बदलाचा परिणाम जम्मू-काश्मीर प्रदेशावर झाला आहे. त्यामुळे बर्फवृष्टी सुरू झाल्याचे सांगण्यात आले. ४ जानेवारीपासून सलग हा बर्फवृष्टीची चिन्हे आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल व उत्तराखंडमध्ये मोठी बर्फवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम आता देशातील उर्वरित राज्यांच्या तापमानावरही होण्याची शक्यता आहे. अगोदरच अनेक राज्यांत थंडी वाढली आहे.
हिमाचल प्रदेशातही हजेरी :
हिमाचल प्रदेशातील सिमला, धर्मशाला, बिलासपूर, लखीमपूर, लाहौल-स्पिती रोहतांगजवळील सर्व ठिकाणांवर बर्फवृष्टी होण्याची चिन्हे आहेत. उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ, केदारनाथ, युमनोत्री, गंगोत्रीसह उत्तरेकडील शिखर असलेल्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
काश्मीर खोऱ्यात 'चिल्लई कला'
काश्मीर 'चिल्लई कला'चांगला रंग लागला आहे. कडाक्याच्या थंडीचा ऋतू काश्मीरमध्ये ३१ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर काश्मीरमध्ये वारे व वादळ येते. ३१ जानेवारीनंतर २० दिवस चिल्लई खुर्द व १० दिवसांचा कालावधी 'चिल्लई बच्चा'म्हणून ओळखला जातो.
१२ राज्यांत थंडीची लाट, ३ दिवस परिणाम
कडाक्याच्या थंडीने राजधानी दिल्ली गारठली आहे. आता आगामी दोन ते तीन दिवस देशातील १२ राज्यांना थंडीची लाट व्यापणार आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बंगालमधील लोकांना कडाका जाणवणार आहे.
- या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये पश्चिमेकडील वातावरणाचा परिणाम दिसला.
- ४-६ जानेवारीदरम्यान डोंगराळ भागात प्रचंड बर्फवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा इशारा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.