आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याेकाेविकची 55 मिनिटांत विजयी सलामी: कतार ओपन टेनिस स्पर्धा; दामिरचा सलामीला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेहा- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकने यंदाच्या नव्या सत्राला दमदार विजयाने सुरुवात केली. त्याने कतार ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने ५५ मिनिटांमध्ये पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात दामिर जुमहूरचा पराभव केला. याेकाेविकने ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याला आपल्या माेहिमेला चांगली सुरुवात करता आली. यासह त्याच्या नावे आता येथील स्पर्धेत १३ व्या विजयाची नाेंद केली. या ठिकाणी त्याला आतापर्यंत एकाच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे दुसऱ्या मानांकित डाेमिनिक थिएमने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या पिएरे ह्यूज हर्बटचा पराभव केला. त्याने ६-३, ७-५ असा एकतर्फी विजय साकारला. तसेच दुखापतीमधून सावरलेल्या डेव्हिड गाेफिनने सलामीचा सामना जिंकला. त्याने पहिल्या फेरीमध्ये लिथुआनियाच्या क्वालिफायर रिकार्डिस बेर्नाकिसवर मात केली. त्याने ३-६, ६-४, ७-६ ने राेमहर्षक विजय मिळवला. 

 

सर्बियाच्या १४ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन नाेवाक याेकाेविकने सत्रातील पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळी केली. त्यामुळे त्याला पहिला सेट सहज जिंकता आला. दरम्यान, दामिरचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याचा सामन्यादरम्यान नंबर वन खेळाडूसमाेर फार काळ निभाव लागला नाही. 

 

वावरिंकाची शर्थीची झुंज 
तीन वेळच्या ग्रँडस्लॅम किताब विजेत्या वावरिंकाला सलामीच्या सामन्यात विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. त्याला कारेन खाचानाेवने चांगलेच झुंजवले. मात्र सरस खेळीच्या बळावर वावरिंकाने सलामीला बाजी मारली. त्याने ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. वावरिंका आणि याेकाेविक यांच्यात सेमीफायनल हाेण्याची शक्यता आहे.