आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र संघावर रिद्धी-सिद्धीची कृपा; पदकाने करून दिला स्पर्धेचा श्रीगणेशा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- औरंगाबादच्या प्रतिभावंत युवा जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी या हत्तेकर भगिनींची यजमान महाराष्ट्र संघावर पहिल्याच दिवशी माेठी कृपा झाली. त्यामुळे यजमान महाराष्ट्राला खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सर्वाधिक पदकांच्या माेहिमेचा दमदार श्रीगणेशा करता आला. सिद्धी आणि रिद्धीने महाराष्ट्राच्या संघाला राैप्य व कांस्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. या दाेघींनीही जिम्नॅस्टिकच्या १७ वर्षाखालील वयाेगटाच्या ऑल राउंड ऑर्स्टिस्टिक इव्हेंटमध्येही पदकाची कमाई केली आहे. या गटात बंगालची प्रतिष्ठा सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

 

खेलाे इंडिया यूथ गेम्सने यंदा महाराष्ट्रातील क्रीडा विश्वातल्या अनेक माेठ्या स्पर्धांना सुरुवात हाेईल. नव्या सत्रात या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीगणेशा करण्याचा मान पुण्याला मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणी नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशातील प्रतिभावंत युवा खेळाडूंच्या काैशल्य आणि कलागुणांनी परिपूर्ण असलेल्या खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेला बुधवारी उद‌्घाटनाने सुरुवात हाेईल. पुण्यातील बालेवाडी येथे ९ ते २० जानेवारीदरम्यान या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. येथे ६ हजार खेळाडू आले आहेत.

 

यंंदा नव्या सत्रात देशातील माेठ्या स्पर्धेचे यजमान भूषवण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली. त्यामुळे या दुसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया राष्ट्रीय स्पर्धेच्या आयाेजनासाठी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंबर कसली. त्यांनी आपल्या आठ उपसंचालकांसह १२० अधिकाऱ्यांसाेबत घेऊन आयाेजनासाठी अहाेरात्र मेहनत घेतली.  यात जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.   तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचेही (साई) २० अधिकारी आहेत. मागील ६५ दिवसांपासून केंद्रेकर हे आपल्या टीमसाेबत  परिश्रम घेत आहेत.

त्यासाठी क्रीडा आयुक्त केंद्रेकर यांनी स्वत: उभे राहून काही ठिकाणी काम केले. त्याला उपस्थित अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. त्यामुळेच  या स्पर्धेच्या यशस्वी आयाेजनाबाबत अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. यातूनच स्पर्धेच्या आयाेजनाची तयारी जाेमात करण्यात आली. यासाठी अधिकारी पुण्यातच ठाण मांडून बसलेले आहेेत.

 

क्रीडामंत्री तावडे यांनी नियोजनाकडे फिरवली पाठ; पाेस्टरवरूनही गायब 
महाराष्ट्र पहिल्यांदाच या माेठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. त्यासाठी क्रीडा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी कसून मेहनत घेतली. मात्र, त्याच्या तुलनेत प्रत्यक्षात क्रीडामंत्री विनाेद तावडे यांनी याकडे पाठ फिरवल्यासारखेच चित्र आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या आयाेजनाची माेठी जबाबदारी असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.  त्यांनी  या स्पर्धेच्या बालेवाडीला दाेन महिन्यांत केवळ दाेनच वेळा भेट दिली.

 

पाच वेळा पुणे येथे आयाेजित हाेता दाैरा  
या स्पर्धेच्या आयाेजनाची तयारीही मागील दाेन महिन्यांपासून सुरू आहे. यादरम्यान क्रीडामंत्री विनाेद तावडे यांचा पाच वेळा पुणे येथे दाैरा झाला. मात्र, यातील केवळ दाेनच वेळा त्यांनी स्टेडियमची पाहणी केली. या भेटीच्या दरम्यान एका महिनाभराचे अंतर आहे.

 
असे झाले पाच दाैरे :

१, २२ ते २४ नाेव्हेंबर २०१८, १, २२ डिसेंबर २०१८, ६ जानेवारी २०१९.

 

क्रीडा विभागाकडील दुर्लक्ष अद्यापही कायम; आयाेजनाबाबत निरुत्साह
स्पर्धेच्या स्टेडियमपासून पुणे शहरात माेठमाेठे पाेस्टर लागले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फाेटाे आहेत. त्यावरून राज्याच्या क्रीडामंत्री विनाेद तावडेंना बाद केले. त्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांनी दाेनच वेळा स्पर्धेच्या ठिकाणी आढावाही घेतला.  

 

विभागाची नाराजी
शिक्षणासह विनाेद तावडे यांच्याकडे क्रीडा खाते आहे. मात्र, त्यांनी याबाबत काेणत्याही प्रकारचा उत्साह दाखवलेला नाही. मागील चार वर्षांपासून क्रीडा खात्याकडे दुर्लक्षच असल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. 

बातम्या आणखी आहेत...