आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापलेकाने केली महिलेची हत्या, पोलिसावर गोळीबार: 30 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - चंदननगर येथे महिलेची गोळ्या घालून हत्या करणारे आणि पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बापलेक निघाले असून ते सुपारी किलर आहेत. त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनी वडगाव शेरीतून दुचाकी चोरून गुन्ह्यात वापर केल्याचेही समोर आले आहे.   


शिवलाल ऊर्फ शिवाजी बाबूलाल राव (३९) व मुकेश उर्फ माँटी शिवलाल (१९,  नवी दिल्ली) असे आरोपी बापलेकाचे नाव आहे.  मंगळवारी चंदननगरातील एकता ब्रिजेश भाटी (३२) या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोर पुणे स्टेशनवरून झेलम एक्स्प्रेसने दिल्लीस पळून जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार व कर्मचारी मोहसीन शेख यांना आरोपी रेल्वेडब्यात चढताना दिसले. पवार यांनी त्यांची चौकशी केली असता शिवलालने पवार यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी शिवलालला मालधक्का चौकात पकडले, तर मुकेशला झेलम एक्स्प्रेसमधून पळून जात असताना दौंड येथे पोलिसांनी पकडले.  

 

एकता भाटीच्या नवऱ्याच्या जुन्या प्रकरणाचा संबंध ? 
एकताचा नवरा ब्रिजेश भाटीवर दिल्लीत एका महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी ब्रिजेश दीड महिना तिहार कारागृहात होता. जूनमध्ये तो पुन्हा पुण्यात आला. त्यामुळे या पार्श्वभूमीचा एकताच्या हत्येशी संबंध आहे काय, याचा तपास पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...