आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरण : आरोपपत्रासाठी मुदतवाढीचा पुणे कोर्टाचा निर्णय रद्दबातल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेतील चार आराेपी व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा पुणे न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. या पाचही आरोपींवर भीमा कोरेगाव प्रकरणाला चिथावणी देण्याचा आरोप असून उच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला झटका असल्याचे मानले जात आहे. 

 

न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवताना, आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उर्वरित चार आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीवरून हायकोर्टाने १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या निर्णयास स्थगिती दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...