आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगावचे शहीद प्रकाश जाधव यांना साश्रू नयनांनी निरोप, 50 गावांतील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव - जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेले निपाणी येथील जवान प्रकाश जाधव यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश जाधव हे मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. 


बुदिहाळ गावामध्ये प्रकाश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आसपाच्या जवळपास 50 गावांमधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश जाधव यांच्या पश्च्यात पत्नी नीता, तीन महिन्यांची चिमुकली लेक श्रावणी, आई, वडील, भाऊ असे कुटुंब आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रकाश घरी आले होते. काही दिवसांपूर्वीच परतल्यानंतर चकमकीत ते शहीद झाले. 

 

प्रकाश जाधव यांचे पार्थिव त्यांच्या गावी म्हणजे बुदिहाळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्य अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेलाही गावकऱ्यांसह नेते, समाजसेवक मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

 

बातम्या आणखी आहेत...