आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅरी पॉटरच्या कथांद्वारे कायद्याचा अभ्यास, कोलकाता राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठाचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - कायद्याचा अभ्यास खूप अवघड आणि दीर्घकाळ म्हणजे ५ वर्षांपर्यंत चालणारा आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी अनेकदा कंटाळून जातात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत कायद्याच्या विद्यार्थ्यांना आता जादूगार हॅरी पॉटरच्या थीमवर आधारित मांडणी केलेला विषय शिकवण्यात येईल. 

 

सर्व विक्रम मोडणाऱ्या जे.के. रॉलिंग यांच्या कथेचा आधार घेऊन कायद्यातील डावपेचांची माहिती देण्यात येईल. विद्यापीठातील बीए-एलएलबीच्या विद्यार्थ्यांना चौथ्या किंवा पाचव्या वर्षात एक नवीन विषय ऑफर केला जाईल. याचे नाव 'अॅन इंटरफेस बिटवीन फँटसी फिक्शन लिटरेचल अँड लॉ : स्पेशल फोकस ऑन रॉलिंग्ज पॉटरवर्स' असे असेल. या विषयाची निवड करायची की नाही याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे. परंतु तरुण पिढीमध्ये हॅरी पॉटर आणि जे.के. रॉलिंग यांची जबरदस्त लोकप्रियता पाहता हा अभ्यासक्रम खूप प्रसिद्ध होईल, असा विश्वास विद्यापीठ व्यवस्थापनाला आहे. हा अभ्यासक्रम डिझाइन करणारे विद्यापीठातीलच सहायक प्राध्यापक शॉविककुमार गुहा म्हणाले की, 'कायद्याचा अभ्यासक्रम ५ वर्षांचा असतो. यातही अवघड विषय असतात. अभ्यासक्रम प्रयोगात्मक असायला हवा. पण तो खूपच पारंपरिक झाला आहे. कथेवर आधारित नवीन अभ्यासक्रम अस्तित्वात आणल्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक नवीन आव्हान स्वीकारायला तयार होतील.' 

 

पॉटरवर्स नावाने प्रसिद्ध असलेली कथा अमेरिकेतील कंसास व फ्रॉस्टबर्ग विद्यापीठात शिकवली जाते. यूकेतील काही विद्यापीठांमध्येही हा विषय अभ्यासक्रमात आहे. याशिवाय भारतातही २०१२ मध्ये सोनिपतच्या जिंदल ग्लोबल लॉ स्कूलमध्ये हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला होता. काही काळ प्रायोगिक तत्त्वावर हा अभ्यासक्रम चालवल्यानंतर तो बंद झाला. आता याला पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...