आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जफेडीसाठी सवलत तसेच नवे कर्ज देण्याची 'जेट'ची बँकांकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नगदीच्या संकटाचा सामना करत असलेल्या जेट एअरवेजने बँकांना सध्याचे कर्ज फेडण्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन कर्ज मंजूर करण्याचीही विनंती केली आहे. या घटनाक्रमाशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. 


ज्या हवाई मार्गावरील वाहतुकीतून नफा मिळत नाही, अशा मार्गावर चालणाऱ्या १२ विमानांना कंपनीने आधीच विमानतळावर उभे केले आहे. त्याव्यतिरिक्त नाॅन-कोअर क्षेत्रातील कर्मचारी कमी करण्याचाही विचार कंपनी करत आहे. देशातील सर्वात मोठी फुल-सर्व्हिस एअरलाइन मागील ११ वर्षांत ९ वर्षे तोट्यात राहिली आहे. सध्या कंपनीसमोर रुपयातील घसरण, कमी भाडे आकारणाऱ्या विमान कंपन्यांचे आव्हान आणि जेट इंधनातील दरात झालेली वाढ ही आव्हाने आहेत. 

 

भारतीय बँक किंगफिशर एअरलाइन्सकडून सुमारे ९,००० कोटी रुपयांची वसूल करण्यात आतापर्यंत अपयशी ठरल्या आहेत. जेट एअरवेजला आणखी कर्ज देण्यास या बँकांनी आधीच नकार दिला आहे. 


असे असले तरी जेट एअरवेज कंपनीला बँकांशी काही प्रमाणात सहमती होण्याच्या अपेक्षेने मंगळवारी मुंबई शेअर बाजारात जेटच्या शेअरमध्ये ३.७६ टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर २१९.५५ रुपयांच्या उच्चांकावर गेल्यानंतर ०.५० टक्क्यांच्या वाढीसह २१२.६५ रुपयांवर बंद झाला. 


जेट एअरवेजच्या एकूण कर्जात कमी कालावधी असलेले ४६ टक्के कर्ज आहे. इतर विमान कंपन्यांच्या कर्जाच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे नरेश गाेयल यांच्या नेतृत्वातील या कंपनीला पैसे जमा करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. कंपनीचे बाजार मूल्य कमी होऊन २,४१५.६५ कोटी रुपयांवर आले आहे. 

 

रुपयात घसरणीमुळे कंपनीच्या विमान खर्चात वाढ 
जेटवर ७,३६० कोटींचे कर्ज आहे. यातील ६५ टक्के कर्ज डॉलरमध्ये आहे. 
या वर्षी अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया १३ टक्क्यांनी घसरला आहे. 
यामुळे विमान वित्त पुरवठ्यावरील खर्च वाढण्याची शक्यता वाढली आहे. 

 

तीन वर्षांत नगदीत ८५ टक्के घट 
२,०८० कोटी रुपयांची नगदी होती विमान कंपनीकडे मार्च २०१५ मध्ये. 
३२० कोटी रुपयांवर आली नगदी मार्च २०१८ मध्ये. 

बातम्या आणखी आहेत...