आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश : मंत्रालयात वंदे मातरम् यापुढे बंद; राजकीय वाद उफाळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- दर महिन्याच्या पहिल्या तारखेस मंत्रालयासमोरील पार्कमध्ये वंदे मातरम् गीत ऐकवण्यात येत होते. परंतु काँग्रेस पक्षाच्या कमलनाथ सरकारने ही गीत ऐकवण्याची प्रथा बंद केली. यासंदर्भात बँड पथकासही कळवण्यात आले नाही अथवा कर्मचाऱ्यांनाही काही सांगण्यात आले नव्हते. 

 

सामान्य प्रशासन विभाग मात्र एक आठवड्यापूर्वी याची रूपरेषा तयार करण्याबरोबरच  प्रमुख पाहुण्यांनाही निमंत्रित करत असे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयामुळे अचानक राजकीय वातावरण तापले. भारतीय जनता पक्षाने  यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. आता भारतमाता की जय अशी घोषणा देण्यावर बंदी घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 
 
वाद वाढला तेव्हा एसीएस यांना बोलावले, सीएसही आले 
राजकीय वातावरण तप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव कमल यांना वंदेमातरमची फाइल घेऊन बोलावले. यानंंतर थोड्याच वेळात मुख्य सचिव एस. आर. मोहंतीसुद्धा निवासस्थानी आले. राष्ट्रगीत सुरू करण्यासाठी आजवरचा तपशील त्यांना दिला. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, मंत्रालयात ३ हजार कर्मचारी व अधिकारी आहेत. परंतु वंदे मातरम् म्हणण्यास फक्त २०० ते ३०० कर्मचारी-अधिकारी येतात. असे राष्ट्रप्रेम काय कामाचे? दरम्यान, वंदेमातरमवरून रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. नंतर मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला. 
 
राष्ट्रगीत गाण्यास लाज वाटते का?  
काँग्रेस नेत्यांना वंदे मातरम् म्हणता येत नाही की याची लाज वाटते ते स्पष्ट करावे. मी स्वत: दर महिन्याच्या एक तारखेस वल्लभ भवनच्या प्रांगणात जनतेसोबत वंदे मातरम् गीत गाणार आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक कॅबिनेट बैठकीपूर्वी व दर महिन्याच्या पहिल्या तारखेस वंदे मातरम् झालेच पाहिजे. -शिवराजसिंह चौहान,  माजी मुख्यमंत्री