आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाकुंभ 2019 : आयआयटी, आयएमएममध्ये लेक्चर देतात निरंजन आखाड्याचे साधू-संत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज- सनातन संस्कृती या पुस्तकात महापर्व सिंहस्थासंबंधी सिद्धार्थ शंकर गौतम यांनी लिहिले आहे की, निरंजनी आखाड्याची स्थापना ९०४ मध्ये मांडवीत झाली होती. तर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे १९०४ वर्ष असल्याचे म्हटले आहे. सर्व आखाड्यात निरंजनी आखाडा सर्वात प्रसिद्ध आहे. यात सर्वात जास्त उच्चशिक्षित साधू-संत आहेत. ते शैव परंपरा मानतात. जटा ठेवतात. या आखाड्याचे इष्टदेव कार्तिकेय आहेत. ते देवांचे सेनापती होते. याचा इतिहास डुंगरपूर राज्याचे राजगुरू मोहनानंद याच्या काळाशी जुळतो.

 
जगातील मोठ्या कार्यक्रमास युनेस्कोचीही मिळाली मान्यता 
१५ जानेवारी २०१९ पासून पहिल्या शाही स्नानाने कुंभमेळ्यास सुरुवात होईल. तो ४ मार्चपर्यंत चालणार आहे. सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमास युनेस्कोनेही मान्यता दिली आहे. या मेळ्यात येणारे साधू व आखाड्यातील काही खास प्रमुख आकर्षणाचे केंद्र असतात. यापैकी निरंजन आखाड्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यात सुमारे ७० टक्के साधू व संत उच्चशिक्षित आहेत. यात डॉक्टर, कायदेतज्ज्ञ, प्राध्यापक, संस्कृतचे विद्वान व आचार्य यांचा समावेश आहे. संतांच्या शिक्षणाची तसेच शैक्षणिक पात्रतेची माहिती मिळाली आहे. 

 

निरंजनी आखाड्याचे डॉक्टर-कायदेतज्ञ 
या आखाड्याचे महेशानंद गिरी भूगोलाचे प्राध्यापक आहेत, तर बालकानंद डॉक्टर व पूर्णानंद गिरी कायदेतज्ज्ञ व संस्कृत विद्वान आहेत. संत आनंदगिरी यांनी आयआयटी खरगपूर, आयआयएम शिलाँगमध्ये लेक्चर्स दिलेली आहेत. 

 

१०० हून अधिक महामंडलेश्वर उच्चशिक्षित 
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी सांगतात, निरंजनी आखाडा अलाहाबाद-हरिद्वारमध्ये पाच शाळा-महाविद्यालये चालवतो. हरिद्वारमध्ये एक संस्कृत महाविद्यालय आहे. याचे व्यवस्थापन संत सांभाळतात. वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिकवतात.