आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टीव्हीवर काम करणारे माझ्यासाठी सुपरमॅन आहेत' - मकरंद देशपांडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'सर्कस', 'सैलाब' आणि 'बदला' इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता मकरंद देशपांडे आता २० वर्षांनंतर 'विक्रम वेताळ'मध्ये वेताळाची भूमिका साकारतोय. मकरंद दोन दशके टीव्हीपासून दूर होता. या वेळी तो म्हणतो, 'मी रंगभूमीमध्ये एवढा सक्रिय आहे की, त्यात व्यग्र राहावे लागते. अशा वेळी टीव्हीसाठी वेळ काढणे कठीण जाते. दुसरे म्हणजे टेलिव्हिजनमध्ये एवढे काम आहे की, त्यासाठी महिन्याला ३२ दिवस द्यावे लागतात. 
मी एवढा वेळ देऊ शकत नाही. तथापि, 'विक्रम वेताळ'मध्ये मला महिन्यातील फक्त ७ ते १० दिवसच द्यायचे आहेत. एक कथा २ ते ४ दिवस चालेल. मला आधीच सांगण्यात आले की, यात ३० दिवसांचे काम नसेल. कारण यात अनेक पात्रे आहेत.' मकरंद पुढे म्हणाला, 'टीव्ही माध्यम सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे आहे. 


अनेक ठिकाणी माझे चित्रपट पाहण्यात आलेले नाहीत. तर 'बदला', 'सर्कस', 'सैलाब' इत्यादी मालिका खूप लोकांनी पाहिल्या.' अनेक वर्षांपासून टीव्हीवर काम करणाऱ्या कलावंतांना मकरंद सुपरमॅन म्हणतो. त्याच्या मते, 'टीव्हीवर एवढा वेळ देणारे कलावंत कमालीचे आहेत. ते सुपरमॅनप्रमाणे काम करतात, असे मला वाटते.' 

बातम्या आणखी आहेत...