आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग आणि शिक्षण सांभाळून मुलांना नृत्यू शिकवतेय 'राधाकृष्ण' मालिकेतील 'राधा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: टी व्ही मालिका 'राधाकृष्ण'मध्ये राधाची भूमिका साकारणारी मल्लिका सिंह सध्या बऱ्याच गोष्टी एकाच वेळी सांभाळत आहे. मुंबईपासून दूर उमरगाव याचा सेट लावण्यात आला आहे. येथे मल्लिका शूटिंग करत आहे, मात्र याचा परिणाम तिच्या शिक्षणावरही होत आहे. शूटिंग आणि कॉलेज सांभाळण्यात तिला थोडी अडचण होत आहे. 


सेटवर आई शिकवते
मल्लिका सांगते., मी शंकर नारायण कॉलेज, मुंबईमधून बीएचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे वेळ सांभाळणे थोडे अवघड झाले आहे. कधी-कधी शूटिंगमधून वेळ काढून थेट कॉलेजला जाते आणि कॉलेजमधून थेट शूटिंगला यावे लागते. मला अभिनयाची आवड आहे, मात्र शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आई सांगते. सेटवर आईच मला शिकवते. सध्या निर्मिती कंपनीकडून हजर राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामळे आता फक्त विशेष प्रकल्प, महत्त्वाचा वर्ग आणि परीक्षांसाठीच कॉलेजला जाते. त्यासाठी शूटिंगमधून सुटीदेखील मिळते. 

 

मुलांना नृत्य शिकवते... 
मल्लिकाला जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती मुलांना नृत्यदेखील शिकवते. मला येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, गावातील मुलांना नृत्याची आवड आहे, त्यामुळे मी त्यांना नृत्य शिकवतेय. शूटिंगमुळे दर रविवारी संध्याकाळी मी त्यांना बॉलीवूड नृत्य शिकवते.'

बातम्या आणखी आहेत...