आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने मंगळवारी बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी आणि सरव्यवस्थापक सबा करीम यांना ई-मेल केला. टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भेदभाव झाल्याचा आरोप तिने केला. मितालीने कर्णधार हरमनप्रीतविरुद्ध अधिक नाराजी व्यक्त केली नाही. परंतु प्रशिक्षक रमेश पोवार हे संघातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप केला. मितालीने केलेल्या ई-मेलमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केला. सर्व समस्या प्रशिक्षक रमेश यांच्यामुळे होत असल्याचे तिने ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी फलंदाजीचा क्रम बदलला : मिताली
२० वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा इतकी निराश झाले आहे. काही शक्तीशाली लोक मला पूर्णपणे देशोधडीला लावू पाहत आहेत. सीओए सदस्य डायनाही त्यांच्या पदाचा माझ्याविरुद्ध गैरवापर करतील, असे मला कधी वाटलेही नाही. पण सेमीफायनलमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितल्यानंतर ताकदवान लोक काहीही करू शकतात, याचा मला विश्वास झाला. मला हरमनप्रीतकडून काही अडचण नाही. मूळ समस्या प्रशिक्षक रमेश पोवार हे आहेत. त्यांनी मला नेहमी अपमानास्पद वागणूक दिली. श्रीलंका टूर ते विश्वचषक वॉर्मअप गेम्सपर्यंत मी ओपनिंग केले. पण न्यूझिलँडविरुद्धच्या सामन्यात एक दिवस आधी रमेश यांनी मला मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले. परिणामी ३८ धावांवर ३ बळी गेले. त्यानंतरही रमेश त्यांच्या नवीन जोडीला खेळवण्यासाठी अडून बसले. पाकिस्तानविरुद्ध करा किंवा मरा अशी स्थिती होती.
त्यामुळे मी संघ व्यवस्थापकांशी बोलला. मी ओपनिंग करणार हे स्पष्ट झाले. मी चांगल्या धावा काढल्या आणि सामनाही जिंकला. तरीही रमेश यांचे वागणे वाईटच होते. मी पुन्हा संघ व्यवस्थापकांशी बोलले. त्यांनी माझी आणि रमेश यांची बैठक घेतली. व्यवस्थापकांसमोर त्यांनी आपली चूक असल्याचे मान्य केले. तेथेच त्यांचा इगो दुखवला. नंतरही अशी वागणूक कायम होती. आता मला काही न्याय मिळेल का?
-मिताली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.