आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्रुनुकसानीच्या दाव्यावर अकबरांचा 31 ऑक्टोबरला जबाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर दाखल अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी करण्यास कोर्टाने संमती दर्शवली. यावर 31 ऑक्टोबरला अकबर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. प्रिया यांच्या आरोपांनंतर सुमारे 20 महिलांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी समर विशाल यांनी गुरुवारी अकबर यांचे वकील अॅड. गीता लुथरा यांचे युक्तिवाद ऐकून घेतले. प्रिया रमाणी यांनी केलेले ट्विट अब्रुनुकसान करणारे असल्याचे लुथरा म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...