आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- आमदार रवि राणा यांच्या घरापुढे दि. २६ नोव्हेंबरला माजी भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते दुपारी २ च्या सुमारास बेशरमचे झाड लावणार आहेत. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय यांनी हा इशारा दिला.
आमदार राणा यांनी सातुर्णा विहार चौकातील नाना-नानी पार्क हटवण्याची भारतीय यांनी मागणी करून यासंदर्भातील दस्तावेज खोटे असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही खरे असाल तर ते सिद्ध करून द्या, असे आव्हान आम्ही आमदार राणा यांना दिले होते. आमच्याकडे नाना-नानी पार्क बेकायदेशीर असल्याचे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही त्याविरोधात भक्कमपणे उभे आहोत. आम्हाला आमदार राणा यांनी ते खरे असल्याचे सिद्ध करून दाखवावे. मात्र त्यांनी तसे केले नसल्यामुळे आम्ही त्यांच्या घरापुढे आज बेशरमचे झाड लावणार आहोत, असे भारतीय यांनी सांगितले.
कल्याणनगर येथील रस्ते बांधकामाचे भुमीपूजन पालकमंत्र्यांनी केले होते. या भूमीपूजनाच्या वादाचे राजकीय पडसाद शहरात उमटत आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांना बालकमंत्री संबोधणाऱ्या आमदार राणा यांचा भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी खरपूस समाचार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.