आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या विदेश दौऱ्यावर 1484 काेटी रुपये खर्च; साडेचार वर्षांत 850 तास विमानात मुक्काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यांमुळे चर्चेत राहतात. त्यांनी अापल्या कार्यकाळात ८५ पेक्षा जास्त देशांचा दाैरा केला अाहे. त्यांनी ८५० तास विमानात प्रवास केला अाहे. १६ व्या लोकसभेत १६ मे २०१४ राेजी नरेंद्र माेदी सत्तेत अाले. १६०० पेक्षा जास्त दिवसांच्या त्यांच्या कार्यकाळात १७० पेक्षा जास्त दिवस ते विदेशात राहिले. त्यांनी आतापर्यंत ४९ दाैरे केले. ८५ देशांमध्ये ते गेले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दुसऱ्या कार्यकाळातील पाच वर्षांत ३७ दाैरे करून ५० देशांत गेले हाेते. २०१४ मधील सहा महिन्यांत नरेंद्र माेदी ९ देशांच्या दाैऱ्यावर हाेते. १३० तास ते विमानात हाेते. पुढील वर्षी त्यांनी २६ विदेशी दाैरे केले. २२० तास विमान प्रवास हाेता. त्यांनी सर्वात कमी विदेश दाैरे २०१७ मध्ये केले. या वर्षी ते ९ देशांच्या दाैऱ्यावर हाेते. २१ दिवसांचा विदेश प्रवास केला. ११५ तास विमानात हाेते.

 

सन २०१८ मध्ये २३० तासांपेक्षा अधिक वेळ ते विमानात हाेते. या वर्षी ते २२ देशांत गेले अाहेत. सन २०१८ मध्ये ३६ दिवस ते विदेशात हाेते. त्यांच्या विदेश दाैऱ्यात ३०० पेक्षा जास्त करार झाले अाहेत. जगातील पहिल्या पाच देशांशी त्यांचे संबंध चांगले राहिले अाहेत. रशिया, चीन संबंध निर्माण करताना अमेरिका, जपानशीही त्यांनी घनिष्ठ संबंध ठेवले.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माेदी यांनी रात्रीच जास्तीत जास्त प्रवास केला. या वर्षी त्यांचा शेवटचा दाैरा अर्जेंटिनात हाेता. तेथील जी-२० शिखर परिषदेत ते सहभागी झाले हाेते. चार दिवसांच्या या दाैऱ्यात ४८ तास ते विमानात हाेते. तसेच ४८ तास ते जमिनीवर हाेते. या दाैऱ्यात २० पेक्षा जास्त नेत्यांशी त्यांची चर्चा झाली. माजी परराष्ट्र सचिव शशांक म्हणाले की, जगात रिजनल ग्रुप झाले अाहेत. त्यामुळे विदेश दाैऱ्यांची गरज वाढली अाहे. अशात एकाच दिशेत जास्तीत जास्त देश कव्हर करणे एक कला अाहे. राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या विदेश दाैऱ्यांवर जून २०१४ पासून अातापर्यंत १४८४ काेटी रुपये खर्च झाले अाहेत. त्यात हाॅटलाइनवरील ९ काेटींचा समावेश अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...