आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉ. डहाकेला अटक अन 'एमसीआर'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील डॉ. सतीश डहाकेच्या दुर्वांकूर रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर डॉ. डहाकेने शुक्रवारी असभ्य वर्तन करून धमकी दिल्याची तक्रार एका महिला रुग्णाने राजापेठ पोलिसात दिली होती. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी डॉ. डहाकेविरुद्ध शुक्रवारी (रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली मात्र अटकेनंतर लॉकपमध्ये टाकण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता अचानकपणे प्रकृती बिघडली आणि रात्रभर शासकीय रुग्णालयात दाखल केले.

 

दुसरीकडे शनिवारी डॉ. डहाकेला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन काेठडी सुनावली.डॉ. डहाकेच्या रुग्णालयात नणंदेसोबत एक २६ वर्षीय महिला रुग्ण शुक्रवारी दुपारी तपासणीसाठी आली होती. यावेळी तपासणीच्यावेळी डॉक्टरने असभ्यपणा केला. यावेळी डॉक्टरने महिलेला काही प्रश्न विचारले, या प्रश्नांमुळे महिला लाजीरवाणी झाली. इतकेच नाही तर डाॅक्टरने महिलेला सांगितले की, याबाबत पतीला सांगायचे नाही, अशी धमकी दिली होती.
पोलिसांनी अटक करताच बिघडली डाॅक्टरची प्रकृती

बातम्या आणखी आहेत...