आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्णा महोत्सवात 10 बाय 10 फूटच्या कढईत बनवले तब्बल एक हजार किलो पोहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मोर्णा महोत्सवात शनिवारी सकाळी १ हजार किलो पोहे तयार करण्यात आले. नीरज आवंडेकर यांच्या पुढाकाराने दीड तासात पोहे तयार केले. मोर्णा महोत्सवात आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी शाळांतील विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थितांनी त्याचा आस्वाद घेतला.

 

या वेळी नीरज आवंडेकर यांच्या मदतीला निशिता आवंडेकर, कमलकुमार गुप्ता, योगेश जाधव, शैलेश भटकर, प्रशांत चुटके मदतीला होता. समितीचे अध्यक्ष अशोक ढेरे, प्रा. गजानन नारे, शरद कोकाटे, अविनाश पाटील, पुरुषोत्तम शिंदे, संजय गवई, प्रा. सुहास उगले, जगदीश झुनझुनवाला, सोनल ठक्कर यांच्यासह नागरिकांचा सहभाग होता. एस़डीआे प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्रा. प्रदीप राजपूत उपस्थित होते.


पोहे : ५०० किलो
तेल, मटार,कांदे, मिरची, कोथिंबीर
५०० किलो.
वापर रात्रीपासूनच केली होती तयारी
दीड तास लागले तयार व्हायला

 

बातम्या आणखी आहेत...