आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकारी म्हणाले हाेते, आपके दाे-तीन दिन रहे है, जि. प. अध्यक्षा : मै आज ताे हूँ ना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीच्या प्रकरणाच्या निमित्ताने माेर्णा महोत्सवाबाबत राेज नवीन माहिती उजेडात येत आहे. माेर्णा महोत्सवात गर्दी जमवण्यासाठी ग्रामीण स्वयंसहाय्यतता महिला बचत गटांकडून उत्पादित साहित्याचे प्रदर्शन व विक्रीच्या (अर्थात स्वस्ति प्रदर्शन)आयाेजनाचा घाट घालण्यात आला हाेता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रदर्शनाबाबत जि. प.च्या अखत्यारित असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह जि.प.च्या अधिकाऱ्यांनी अध्यक्षा संध्या हरिदास वाघाेडे यांच्याशी चर्चाच केली नव्हती. त्यानंतर अध्यक्षा वाघाेडे यांनी २७ डिसेंबर राेजी आक्रमक पवित्रा घेत आक्षेप नाेंदवत थेट विभागीय आयुक्तांना पत्रच दिले हाेते. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्षा वाघाेडे यांना 'मॅडम अब आपके दाेन-तीन दिन ताे है' असे म्हणाले हाेते. यावर अध्यक्षांनी 'मै आज ताे अध्यक्ष हूं ना', अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर दिले हाेते. २९ डिसेंबर राेजी विद्यमान जि.प. सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला हाेता. मात्र जि .प.आरक्षण प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक घेता येत नाही. २९ डिसेंबर राेजी कार्यकाळ संपणारच असल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असावे. मात्र नंतर शासनाने जि.प.ला मुदतवाढ दिली हाेती. 

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियान,विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्ति प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात येते. स्वयं सहाय्यता महिला बचत गटांकडून उत्पादित वस्तूंचे विविध साहित्याचे स्टाॅल्स लावण्यात येतात. या प्रदर्शनाच्या यामाध्यमातून महिलांचा आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त हाेताे. हे प्रदर्शन यंदा २९ ते ३१ डिसेंबर या दरम्यान शास्त्री स्टेडियम येथे आयाेजित करण्यात येणार हाेते. यासाठीचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्षा संध्या वाघाेडे यांना दिले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहवे, असेही पत्रात नमूद करण्यात आले हाेते. मात्र यापूर्वी कोणतीही चर्चा न करताच थेट कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याने अध्यक्षांना आश्चर्य वाटले हाेते. 

 

जि. प. अध्यक्षांनी पत्रात केली प्रश्नांची सरबत्ती 
स्वस्ति प्रदर्शनाबाबत जि.प. अध्यक्षा वाघाेडे यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले. सार्वजनिक कार्यक्रमाचा शिष्टाचार असताे. प्रदर्शन आयोजनाबाबत माझ्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही. या प्रदर्शनाची पूर्व प्रसिद्धी हाेणे आवश्यक हाेते. या प्रदर्शनाबाबत जि.प.अधिकाऱ्यांना मला सांगण्याची गरज का वाटली नाही, घाईत प्रदर्शनाच्या आयाेजनाची कारणे काय, कार्यक्रमाची माहिती जि.प. सदस्यांनाच नसेले, तर ग्रामस्थांपर्यंत ती कशी पाेहाेचेल, असे अनेक सवाल अध्यक्षांनी पत्रात उपस्थित केले आहेत. 

 

महोत्सवाच्या टाेळीत झाला हाेता वाद 
माेर्णा महोत्सवाच्या आयाेजन टाेळीत समाराेपीय कार्यक्रमावरून वाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. म्युझिक सिस्टिमच्या खर्चावरून टाेळीच्या सदस्यांमध्ये चर्चा झाली. मात्र यावर एकमत झाले नाही आणि परिणामी वाद झाल्याचे समजते. दरम्यान या महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या निधीवरुन मंगळवारी झालेल्या पत्रकारांच्या सभेत अनेक चर्चा ऐकण्यास मिळाल्या. मद्यव्यवसायी, वित्तीय संस्था, कंत्राटदारांकडून निधी गाेळा करण्यात आल्याचे काही पत्रकारांनी सांगितले. यावर माेर्णा फाउंडेशनचे प्रा. मधु जाधव यांनी लवकरच याबाबतचा संपूर्ण हिशेब जाहीर करण्यात येईल, असे सांगितले हाेते. 

 

'ते' आले, कार्यालयामध्ये काही वेळ थांबले अन् नंतर निघून गेले 
अकोला येथील पत्रकारांना निवासस्थानी बोलावून गैरवर्तवणूक करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा येथे पत्रकार संघटनांनी निषेध केला. शिवाजी पार्कमध्ये बुधवारी दोन जानेवारीला निषेध सभा झाली. या प्रसंगी हरिओम व्यास, रामदास काळे, कमलकिशोर भगत, जगन्नाथ कोंडे, विठ्ठलराव गुजरकर, मंगेश लोणकर, मुकुंद कोरडे, किरण भडंग, सोनु सावजी, लकी इंगळे, संतोष विणके, सारंग कराळे, प्रशांत महल्ले, गोपाल नारे, विनोद राठोड, अकबर खान, तुषार अढाऊ, प्रमोद सावरकर, अनिल वगारे, शे.अहेमद शे.बब्बु, नीलेश झाडे, स्वप्निल सरकटे, विजय भगत कुशल भगत, कमलेश राठी आदी उपस्थित होते. 

 

प्रदर्शनाच्या प्रक्रियेची संपूर्ण चाैकशी हाेणार 
स्वस्ति प्रदर्शनाबाबत विभागीय आयुक्तांना पत्र दिले हाेते. या वेळी उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी 'मॅडम अब आपके दाेन-तीन दिन ताे है' असे म्हणाले हाेते. यावर मीही त्यांना 'मै आज ताे अध्यक्ष हूं ना', असे म्हटले हाेते. प्रदर्शनाच्या प्रक्रियेची चाैकशी, कागदपत्रांची पडताळणी हाेणार आहे. संध्या वाघाेडे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, अकाेला.

 

मतदार जनजागृतीच्या मोहिमेतही चमकोगिरी 
काही दिवसांपूर्वी मतदार नाेंदणी जनजागृतीसाठी माेहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने शहरात फ्लेक्स लावले हाेते. या फ्लेक्सवर या अधिकाऱ्याने स्वत:चा सफारी सुट, गाॅगल लावून असलेला फाेटाे प्रकाशित केला.या उद्दाम अधिकाऱ्याची चमकोगिरी येथेच थांबली नाही. त्याने या फ्लेक्सचे फाेटाे अापल्या मित्रांनाही पाठवले. 


पत्रकारांना दिलेल्या गैरवर्तवणुकीच्या प्रकरणानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात न फिरलेले जिल्हाधिकारी बुधवारी सकाळी कार्यालयात आले. त्यांनी एका मुद्द्यावर लाेकप्रतिनिधीशी-अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते दुपारी १२-१२.३०पर्यंत कार्यालयात थांबले. त्यानंतर ते अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील किनखेड पुर्णा येथे गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांवर हल्ला चढवल्याचा तीव्र निषेध व्यक्त झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चर्चा अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सुरु झाली. अनेक कर्मचाऱ्यांनी खासगीत बाेलताना अधिकाऱ्याच्या उद्धटपणाचे कटू अनुभव कसे आले, याचा पाढाच वाचला. बरे झाले अद्दल घडल, असेही काही कर्मचारी बाेलत हाेते. 

 

गैरवर्तवणूक प्रकरणानंतर शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर अनुभव कथन केले. भर बैठकीत अधिकारी कोणत्याही प्रश्नावर थेट एकेरी भाषेत चिडून बाेलताे. धारेवर धरताना समाेरच्या कर्मचाऱ्याचे वय किती आहे, याचेही त्यांना भान राहत नाही. त्या अधिकाऱ्याच्या वयाएवढी शासकीय सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाही ते अधिकारी सर्वांपुढे एकेरी भाषेत पाण उतारा करतात, अशीही चर्चा हाेती. या गैरवर्तवणूक प्रकरणाचे पडसाद विविध समाज माध्यमांमध्येही उमटले. नेटीझंन्सनी माध्यमांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत माध्यमच अशा हुकूमशाही प्रवृत्तीला वेसण घालू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 

'दिव्यमराठी'ची आक्रमक भूमिका 
जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या गैरवर्तनानंतर सगळ्या पत्रकार संघटनांनी एकत्र येत लढा उभारला आहे. दैनिक 'दिव्य मराठी' ने ही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत या अधिकाऱ्याच्या वागणुकीच्या तसेच महोत्सव आणि अशा विषयात होत असलेल्या अनियमिततेबाबतची माहिती वाचकांसमोर ठेवली. या भूमिकेचे अकोलेकरांनी भरभरून स्वागत केले. दिवसभर 'दिव्य मराठीच्या वृत्ताची चर्चा तर होतीच सोबतच वृत्तांकन सोशल माध्यमांमार्फत व्हायरल केले जात होते. 

 

सकाळी बैठक- दुपारी दाैरा 
बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी अकाेला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना व केराेसिन परवानाधारक हाॅकर्सच्या पदाधिकारी व लाेकप्रतिनिधींनी चर्चा केली. केराेसिन वितरण व मानधनाबाबत ही चर्चा करण्यात आली. या वेळी काही अधिकारीही उपस्थित हाेते. त्यानंतर जिल्हाधिकारी किनखेड पूर्णा येथे गेले. 

 

व्हीसीतही नव्हते 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी लोकसंवाद कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हयातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी योजनेतील घरकूल लाभार्थ्यांशी बुधवारी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात हा संवाद साधला. येथेच त्यांचा कक्ष आहे. हा संवाद सुरु असताना ते कक्षातच हाेते. मात्र ते व्हीसीत आले नाहीत. येथे निवासी उपजिल्हाधिकारी खवले हाेते.