आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर राष्ट्रवादी-काँग्रेसचे 40-22 जागांवर एकमत, महापालिका दोन्ही काँग्रेसकडून घटक पक्षांना प्रत्येकी तीन जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी 40, तर काँग्रेस 22 जागा लढवणार आहे. दोन्ही काँग्रेसकडून युनायटेड रिपब्लिकन पक्ष व कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येक तीन अशा सहा जागा देण्यात येणार आहेत. रविवारी सायंकाळी उशिरा दोन्ही काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

 

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णयासाठी गेल्या तीन दिवसांपासून बैठका सुरू होत्या. आमदार संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आघाडीचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना-भाजपला थांबवण्यासाठीच मैत्रीपूर्ण वातावरणात आघाडीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, काँग्रेसचे सुजय विखे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड, नगरसेवक सुनील कोतकर, रेश्मा आठरे आदी उपस्थित होते. शिवसेना - भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आघाडीच्या घोळात अडकली होती. काँग्रेसला बरोबर न घेता ही निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. परंतु हो नाही म्हणत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आघाडीसाठी तयार झाले. त्यानुसार आमदार जगताप व विखे यांच्यात आघाडीसाठी तीन बैठका झाल्या. त्यात ४०- २२ व घटक पक्षांना ६ असा फॉॅर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर रविवारी सायंकाळी दोन्ही पक्षांनी आघाडीचा निर्णय जाहीर केला. युनायटेड रिपब्लिकन पक्ष व कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही घटक पक्षांनाही आघाडीत स्थान देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांना काँग्रेस तीन व राष्ट्रवादी तीन अशा सहा जागा देणार आहे. दरम्यान, आघाडीचा निर्णय झाला असला, तरी उमेदवारांची यादी मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 

 

उमेदवारांची यादी आज केली जाणार जाहीर 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, डॉ. सुजय विखे, प्रा. माणिक विधाते, अशोक गायकवाड आजी. 

शहरात राष्ट्रवादीची ताकद 


भाजपला थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरणात आघाडीचा निर्णय घेण्यात आला. नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यानुसारच काँग्रेसने जागांची मागणी केली. उगाच जास्त जागांचा हट्ट धरण्यात नको, आघाडी ही जिंकण्यासाठीच असावी, त्यानुसारच जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. 

 

माझ्याकडे पद नाही 
काँग्रेस पक्ष केवळ विखे-थोरातांचा नसून तो सर्वांचा आहे. सध्या माझ्याकडे कोणतेच पद नाही. त्यामुळेच पक्षाने माझ्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली. आम्ही सर्वजण बरोबरच आहोत. काँग्रेसला शहरात विधानसभा निवडणूक लढवायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र शहरातील घराघरात पोहोचला अाहे. परंतु याचा अर्थ काँग्रेसची ताकद कमी अाहे, असा होत नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले. 

 

महापौर आघाडीचाच... 
काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये यश मिळवले. परंतु प्रत्येक वेळी अपक्षांची मदत घ्यावी लागली. यावेळी मात्र आघाडी पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. ४२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याची भाषा करणाऱ्या भाजपला अनेक प्रभागात उमेदवार मिळालेले नाहीत. शिवसेनेची अवस्थाही तशीच आहे. यावेळी आघाडीचाच महापौर हाेणार असल्याचे माजी आमदार दादा कळमकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...